शेतकरी सन्मान निधीचा 17 वा हफ्ता लवकरच येणार, योजनेसाठी नव्याने नोंदणी कशी करावी? जाणून घ्या सोप्या स्टेप्स!
सध्या शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हफ्त्याची ओढ लागली आहे. या योजनेच्या लाभार्थ्याच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तपासणे तसेच नव्याने नोंदणी करणे फार सोपे आहे.
PM kisan 17 Installment : भारतातील शेतकरी बऱ्याच दिवसांपासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हफ्त्याची वाट पाहात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार येत्या जून महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 17 व्या हफ्त्याचे 2000 रुपये येणार आहेत. दरम्यान, या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे नाव नोंदवलेले आहे, त्यांच्याच खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. अशा स्थितीत लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव आहे की, हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडतो. याच पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांच्या यादीतील नाव कसे तपासावे, हे जाणून घेऊ या...
9 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा फायदा
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक हफ्त्याला 2000 रुपये मिळतात. जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळतो. 1 डिसेंबर 2018 रोजी ही योजना चालू करण्यात आली होती. या योजनेत साधारण 9 कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. विशेष म्हणजे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जाते.
या दिवशी येणार 17 वा हफ्ता
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हफ्त्याची वाट पाहात आहेत. आता लवकरच ही प्रतीक्षा संपणार आहे. सध्या देशात लोकसभेची निवडणूक होत आहे. येत्या 1 जूनपर्यंत देशातील मतदानाची प्रकिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतरच जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना 16 वा हफ्ता फेब्रुवारी महिन्यात मिळालेला आहे. त्यावेळी शेतकऱ्यांना एकूण 21 कोटी रुपये देण्यात आले होते.
या योजनेसाठी आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या नावाची नोंदणी झालेली नाही. ही नोंद झालेली नसेल तर चिंता करण्याची गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत स्वत:चा समावेश करून घेता येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
अशी करा नावनोंदणी
>>> या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वांत अगोदर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या संकेतस्थळावर जावं लागेल. त्यानंतर तेथे फार्मर्स कॉर्नर या ऑप्शनवर क्लीक करावे लागेल.
>>> त्यानंतर तुम्हाला न्यू फार्मर रिजस्ट्रेशन वर क्लीक कारवे लागे. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकावा लागेल.
>>> आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकून, तुमच्या राज्याचा ऑप्शन क्लीक करावा लागेल.
>>> त्यानंतर तुम्हाला समोर दिसत असलेल्या फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमीट करावा लागेल. त्यानंतर योग्य ती चौकशी, तपासणी करून संबंधित शेतकऱ्याचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट केले जाईल.
हेही वाचा :
करोडपती व्हायचंय? मग एसआयपीमध्ये किती गुंतवणूक करावी? जाणून घ्या सविस्तर!
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना फटका, अर्ध्या तासात बुडाले तब्बल 4.36 लाख कोटी!
ड्रीम कार घ्यायचीय पण पैसे नाहीत? चिंता सोडा 1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून घरी आणा आवडती कार!