search
×

Sovereign Gold Bond: सोन्यातील गुंतवणुकीसाठी सरकारची जबराट स्किम, किती असेल एक ग्रॅम सोन्याचा दर?

Sovereign Gold Bond : सरकारनं 2015 मध्ये सुरू केलेल्या पहिल्या हप्त्याच्या मॅच्युरिटीवर, गुंतवणूकदारांना 8 वर्षांत 12.9 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.

FOLLOW US: 
Share:

Sovereign Gold Bond Issue: सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करताय? मग हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरेलच पण तेवढाच सुरक्षितही आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नं 18 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या सॉवरेन गोल्ड बाँड इश्यूची (Sovereign Gold Bond Issue) किंमत निश्चित केली आहे. या बॉण्डमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 6199 रुपये गुंतवावे लागतील. हा इश्यू पाच दिवस खुला राहणार आहे. 

बाँडच्या ऑनलाईन खरेदीवर सवलत 

2023-24 सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजनेची ही तिसरी सीरिज आहे, जी 18 ते 22 डिसेंबर दरम्यान खुली असेल. अर्थ मंत्रालयानं शुक्रवारी सांगितलं की, ऑनलाईन गोल्ड बॉण्ड्स खरेदी करण्यावरही सूट मिळेल. रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार, केंद्र सरकारनं ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अशा गुंतवणूकदारांसाठी बाँडची किंमत 6,149 रुपये प्रति ग्रॅम असेल.

सोन्याचे भाव वाढण्याची भीती

सोन्याच्या दरांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सॉवरेन गोल्ड बॉण्डच्या या सीरिजला चांगली मागणी दिसण्याची अपेक्षा आहे. 

RBI चं 66 वं सॉवरेन गोल्ड बाँड

RBI द्वारे जारी केलं जाणारं हे 66 वं सॉवरेन गोल्ड बाँड आहे. पहिला बाँड 2015 मध्ये जारी करण्यात आला होता, जो गेल्या महिन्यात 30 नोव्हेंबर रोजी मॅच्युअर झाला होता. या आर्थिक वर्षातील पहिल्या आणि दुसऱ्या मालिकेला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आणि विक्रमी खरेदी झाली. सप्टेंबरमधील दुसऱ्या मालिकेत लोकांनी 11.67 टन सोन्याच्या बाँडसाठी सदस्यत्व घेतलं होतं आणि पहिल्या मालिकेत 7.77 टन सॉवरेन गोल्ड बाँड सब्सक्राइब  केले होते. 

2015 मध्ये सुरू झाली योजना

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोव्हेंबर 2015 मध्ये सॉव्हरिन गोल्ड बाँड सुरू केली होती, ज्याच्या पहिल्या हप्त्याची मुदत पूर्ण झाली आहे. आठ वर्षांत 12.9 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. सोन्याची भौतिक मागणी कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने ही शासकीय सुवर्ण रोखे योजना (Sovereign Gold Bond) सुरू केली होती. ही योजना सरकारी असल्यामुळे गुंतवणुकीवर सरकारकडून सुरक्षिततेची हमी मिळते.

गुंतवणूकदार हे डिजिटल सोने बाँडच्या माध्यमातून खरेदी करू शकतात आणि खरेदी केलेल्या सोन्याच्या रकमेसाठी गुंतवणूकदारांना समान किमतीचे सॉव्हरिन गोल्ड बाँड जारी केले जातात. त्याची मॅच्युरिची कालावधी 8 वर्षे आहे. पण, तुम्हाला 5 वर्षांनंतर यातून बाहेर पडण्याचा पर्याय देखील आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये तुम्ही 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करता.

टॅक्समध्ये कशी मिळणार सूट? 

बँक एफडी सारख्या गुंतवणूक पर्यायांपेक्षा RBI सार्वभौम गोल्ड बाँड चांगला परतावा देतात. यामध्ये गुंतवणुकीवर मोठ्या रिटर्नसह सुरक्षिततेचीही हमी दिली जाते. त्याला सरकारचा पाठिंबा आहे. त्यामुळे पैसे गमावण्याचा धोका नाही. याशिवाय सोन्याच्या वाढत्या किमतीचा फायदा गुंतवणूकदारांना मिळत असून सोनं खरेदीवर व्याजही दिलं जातं. जर गुंतवणूकदारांनी मुदतपूर्तीपर्यंत बाँड धारण केले तर मुदतपूर्तीच्या वेळी मिळणारं उत्पन्न टॅक्समुक्त असेल. बाँडची मॅच्युरिटी आठ वर्षांत होते. 

कुठे खरेदी करायचे गोल्ड बॉण्ड? 

सॉवरेन गोल्ड बॉण्ड खरेदी करायचे असतील तर ग्राहकाकडे PAN कार्ड असणं गरजेचं आहे. गोल्ड बॉण्डची खरेदी ऑनलाईन करता येऊ शकेल. त्याचसोबत बॅक, स्टॉक होल्डिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडक पोस्ट ऑफिस आणि मुंबई शेअर बाजारामधून या गोल्ड बॉण्डची खरेदी करता येऊ शकेल. या बॉण्डची सेटलमेन्ट डेट ही 9 फेब्रुवारी ही ठरवण्यात आली आहे.

किती प्रमाणात गुंतवणूक करु शकतो? 

एका वर्षाच्या काळात गुंतवणुकदार हा जास्तीत जास्त 400 ग्रॅम सोने खरेदी करु शकतो. तर कमीत कमी एक ग्रॅम सोनं खरेदी करता येते. एखादा ट्रस्ट गोल्ड बॉण्डच्या माध्यमातून जास्तीत जास्त 20 किलो सोन्यामध्ये गुंतवणूक करु शकतो.

याचे फायदे काय? 

गोल्ड बॉण्ड हे टॅक्स फ्री असतात. त्याचसोबत यामध्ये एक्सचेन्ज रेशो नसतो. भारत सरकारच्या वतीनं ही विक्री करण्यात येत असल्याने याच्या गुंतवणुकीत कोणताही धोका नाही. तसेच सोने खरेदी करुन ते घरी ठेवण्यापेक्षा सॉवरेन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक केल्यास ती कधीही सुरक्षित असते. महत्वाचं म्हणजे याची विक्रीही सोपी असते आणि यावर कर्जही मिळू शकते.

Published at : 16 Dec 2023 07:55 AM (IST) Tags: Personal Finance gold business Gold Bond Sovereign Gold Bond Scheme Investment

आणखी महत्वाच्या बातम्या

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

टॉप न्यूज़

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

और एक फायनल...एक कप की ओर

और एक फायनल...एक कप की ओर