RS 2000 Note: 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी RBI समोर रांगा, अचानक लोकांची गर्दी झाल्यानं तपास सुरु
गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India) कार्यालयाबाहेर अचानक 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेणार्यांची जास्त गर्दी जमू लागली आहे.
RS 2000 Note Investigation : गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India) कार्यालयाबाहेर अचानक 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेणार्यांची जास्त गर्दी जमू लागली आहे. अचानक बँकेच्या बाहेर नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्यानं तपास यंत्रणा सतर्क झाली आहे. हे प्रकरण ओडिशातील भुवनेश्वर येथील RBI च्या बँकेसमोर होत आहे. दरम्यान, अहवाल समोर आल्यानंतर यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयासमोर दररोज शेकडो लोकांची गर्दी होत आहे. हे लोक दररोज 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आरबीआय कार्यालयाबाहेर रांगेत उभे असतात. हे प्रकरण ओडिशातील भुवनेश्वर येथील आहे. 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी अचानक जमा झालेल्या गर्दीमुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या प्रकरणाचा अहवाल समोर आल्यानंतर यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
दररोज कोट्यवधी नोटा बदलल्या जातात
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भुवनेश्वरमधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयात गेल्या तीन दिवसांपासून मोठी गर्दी होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक शरद प्रसन्न मोहंती यांनी एएनआयला सांगितले की, दररोज सुमारे 700 लोक 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी येत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, रिझर्व्ह बँकेच्या ओडिशा कार्यालयाने या काळात दररोज 1 ते 1.5 अब्ज रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या आहेत.
सरकारी यंत्रणांकडून तपास सुरु
एएनआयच्या वृत्तानुसार, आरबीआयच्या कार्यालयासमोर अचानक शेकडो लोक जमा झाल्याच्या आणि 2000 रुपयांच्या नोटा बदलून मिळाल्याच्या वृत्तानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अहवालानुसार, ED आणि EOW म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्याचवेळी, आरबीआयच्या प्रादेशिक संचालकांचे म्हणणे आहे की जर तपास यंत्रणा आणि अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल तर ते रिझर्व्ह बँक त्यांना प्रदान करेल. नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. नोव्हेंबर 2016 मध्ये देशात नोटाबंदी करण्यात आली आणि त्यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या. त्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा आणण्यात आल्या. रिझर्व्ह बँकेने 2018-19 पासून 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली होती.
2000 रुपयांच्या 96 टक्क्यांहून अधिक नोटा जमा
मे 2023 मध्ये रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत लोकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची संधी देण्यात आली होती. ज्यासाठी 7 ऑक्टोबरची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. आजही 2000 रुपयांच्या नोटा कायदेशीर आहेत. मुदत संपल्यानंतरही रिझर्व्ह बँकेने आपल्या कार्यालयात 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले होते की 2000 रुपयांच्या 96 टक्क्यांहून अधिक नोटा परत आल्या आहेत. ते म्हणाले होते की, सध्या बाजारात सुमारे 12 हजार कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा चलनात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: