एक्स्प्लोर

RS 2000 Note : 10 हजार कोटी मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा अजूनही बँकेत जमा नाही; RBI कडे किती नोटा जमा?

RS 2000 Note : आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार अजूनही 10 हजार कोटी मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा जमा झाल्या नाहीत.

नवी दिल्ली भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनातून 2000 रुपयांच्या (Rs 2000 notes) नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने ग्राहकांना या दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यास सांगितले होते. मुदत ओलांडल्यानंतरही आरबीआय बाहेर अनेकांची नोटा जमा करण्यासाठी गर्दी आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार अजूनही 10 हजार कोटी मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा जमा झाल्या नाहीत.

रिझर्व्ह बँकेने आज महत्त्वाची माहिती दिली. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या 97 टक्के नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्या आहेत. 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची सुविधा त्यांच्या 19 कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. सर्वसामान्य लोक पोस्ट ऑफिसमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करू शकतात. या सुविधेचा लाभ घेतल्यास, नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी आरबीआय कार्यालयात जाण्याची गरज नसल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. 

RBI ने एक निवेदन जारी करत माहिती दिली आहे. 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा झाली. त्या दिवशी 2000 रुपयाच्या 3.56 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. आता 31 ऑक्टोबर 2023 रोजी केवळ 10,000 कोटी रुपये मूल्याच्या नोटा जमा होणे बाकी आहे. 19 मे 2023 रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानंतर 2000 रुपयांच्या 97 टक्के नोटा आता परत आल्या आहेत.

यापूर्वी, 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलण्यासाठीची मुदत आरबीआयने 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. RBI च्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये 9 ऑक्टोबर 2023 पासून 2,000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय नागरिक 2000 रुपयांच्या नोटा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आरबीआयकडे जमा करण्यासाठी पाठवू शकतात. 

2000 रुपयाची नोट वैध राहणार!

RBI ने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की 2,000 रुपयांची नोट ही वैध असणार आहे. याचा अर्थ ही नोट चलनात वापरता येणार नाही. मात्र, आरबीआयकडे जमा करून ही नोट बदलता येऊ शकते. 2000 रुपयांची नोट सरसकट बाद होणार नाही. मात्र, नोटाबंदीच्या वेळी चलनातून बाद करण्यात आलेली 500 रुपये आणि 1000 रुपयांची नोट वैध नसल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. ही नोट कोणत्याही परिस्थितीत बदलता येऊ शकत नाही. 

आरबीआयने निर्णय का घेतला?

2000 रुपये मूल्याची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये जारी करण्यात आली. त्या वेळी चलनात असलेल्या सर्व 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा एका झटक्यात चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती.  सामान्य व्यवहारांसाठी दोन हजार रुपयांची नोट वापरली जात नसल्याची बाब समोर आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या "क्लीन नोट पॉलिसी" च्या अनुषंगाने, 2000 रुपये मूल्याच्या बँक नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 23 मे 2023 पासून बँकेतून 2000 रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Kanwat on Walmik Karad : वाल्मिक कराडसोबत पोलीस आहेत? पोलीस अधीक्षक म्हणाले,माहिती घेतोयSuresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरीSantosh Deshmukh Wife Beed : मला वाटतं मीच कुणाला मारून येऊ, संतोष देशमुखांच्या पत्नीचा आक्रोषRamdas Athawale Full PC : मला वाटतं धनंजय मुंडेंचे थेट संबंध नाहीत, रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Suresh Dhas : प्राजक्ताताईंची प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, सुरेश धस यांनी भाजपमधून कुणाचा फोन आला ते सांगितलं, म्हणाले...
इतरांना वाटत असेल तू चुकलाय तर.... भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा सल्ला अन् सुरेश धस यांचा दिलगिरीचा निर्णय
मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो; प्राजक्ता माळींनी फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसांचा यु-टर्न
मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो; प्राजक्ता माळींनी फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसांचा यु-टर्न
सोशल मीडियावर फोटो व्हिडीओद्वारे दहशत माजवणं महागात पडणार, गुन्हे दाखल करणार, बीडच्या एसपींचा इशारा 
'...त्यांचे शस्त्र परवाने रद्द करणार' बीडचे SP नवनीत कॉवत यांची माहिती, दहशत माजवणाऱ्यांना इशारा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
Embed widget