Government Schemes : सरकारी योजना; दिवसाला 50 रुपयांची बचत केल्यास मॅच्युरिटीवर मिळतील 35 लाख रुपये
Government Schemes : या सरकारी योजनेमध्ये तुम्हाला कमी जोखमीसह चांगला परतावा मिळू शकतो.
Government Schemes : भारतीय पोस्ट ऑफीसने देऊ केलेली ही ग्राम सुरक्षा योजना गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्हाला कमी जोखमीसह चांगला परतावा मिळू शकतो. ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत, नामनिर्देशित व्यक्तीला 80 वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा मृत्यू झाल्यास, त्याच्या कायदेशीर वारसाला बोनससह विमा रक्कम दिली जाते.
19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ही विमा योजना घेऊ शकतो. या योजनेंतर्गत किमान विम्याची रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवता येते. या प्लॅनचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते. ग्राहकाला प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो. पॉलिसी मुदती दरम्यान डिफॉल्ट झाल्यास, ग्राहक पॉलिसीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रलंबित प्रीमियम भरू शकतो.
कर्ज मिळवा
या विमा योजनेत कर्ज सुविधा ही देण्यात आली आहे. जी पॉलिसी खरेदी केल्यानंतर चार वर्षांनी मिळू शकते. ग्राहक 3 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करणे निवडू शकतो. मात्र, अशावेळी तुम्हाला त्याचा कोणताही फायदा मिळणार नाही. पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इंडिया पोस्टने ऑफर केलेला बोनस आणि शेवटचा जाहीर केलेला बोनस प्रति वर्ष 1,000 रुपये 65 असे आश्वासन दिले होते.
मॅच्युरिटी वरचे फायदे
जर एखाद्याने 19 वर्षांच्या वयात 10 लाखांची ग्राम सुरक्षा पॉलिसी घेतली, तर मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1,515 रुपये, 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1,411 रुपये असेल. पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल. 60 वर्षांसाठी मॅच्युरिटी बेनिफिट 34.60 लाख रुपये असेल.
योजनेची माहिती मिळण्याचे ठिकाण
नामनिर्देशित व्यक्तीचे नाव किंवा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर यांसारख्या इतर तपशीलांमध्ये कोणतेही अपडेट असल्यास, ग्राहक त्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतो. इतर प्रश्नांसाठी, ग्राहक दिलेल्या टोल-फ्री हेल्पलाइन 1800 180 5232/155232 वर किंवा www.postallifeinsurance.gov.in या अधिकृत वेबसाइटवर सविस्तर माहितीसाठी संपर्क साधू शकतात.
हे ही वाचा:
- गुंतवणूक करायची आहे? SBI MF ची मल्टी-कॅप योजना ठरु शकते फायद्याची, जाणून घ्या सर्वकाही
- लॉगिन न करता बँकेतील बॅलेन्स चेक करायचा आहे? SBI Yono चा 'असा' वापर करा
- Share Market : 'हे' शेअर्स आहेत आजचे टॉप गेनर्स आणि टॉप लूजर्स, जाणून घ्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha