PhonePe कंपनीचा म्युच्युअल फंड लवकरच; सेबीकडे अर्ज दाखल
सेबीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, फ्लिक कार्ट इन्वेस्टेड फोनपे प्रा. लि. (Flipkart-invested PhonePe Private Ltd) या कंपनीने 31 डिसेंबर 2021 रोजी म्युच्युअल फंड परवान्यासाठी अर्ज केला आहे
PhonePe : फोनपेचा मुच्युअल फंड लवकरच बाजारात दाखल होणार आहे. कारण डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी फोनपेने म्युच्युअल फंड परवान्यासाठी सेबीकडे अर्ज दाखल केला आहे. सेबीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, फ्लिक कार्ट इन्वेस्टेड फोनपे प्रा. लि. (Flipkart-invested PhonePe Private Ltd) या कंपनीने 31 डिसेंबर 2021 रोजी म्युच्युअल फंड परवान्यासाठी अर्ज केला आहे. फ्लिक कार्टचे सह-संस्थापक सचिन बन्सल हे नावी म्युच्युअल फंडाचे संस्थापक आहेत, ज्यांची ऑक्टोबर-डिसेंबर 2021 या कालावधीत व्यवस्थापनाखालील सरासरी मालमत्ता 92 हजार 959.98 कोटी रुपये होती.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे अशा आणखी 4 कंपन्या आहेत. ज्या सेबीच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. यामध्ये दीपक शेणॉय यांच्या वाईजमार्केट्स अॅनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड, कॅपिटल माइंड, समीर अरोरा यांचे हेलिओस कॅपिटल, राकेश झुनझुनवाला यांचे अल्केमी कॅपिटल आणि (केनेथ अँड्रेड) यांचा समावेश आहे. केनेथ अँड्रेड यांच्या नेतृत्वाखालील ओल्ड ब्रिज कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या म्युच्युअल फंड परवान्यासाठीचे अर्ज दाखल आहेत. याशिवाय एंजल वन आणि युनिफाइ कॅपिटलनेही परवान्यासाठी अर्ज केला आहे. याशिवाय बजाज फिनसर्व्ह, झिरोदा ब्रोकिंग आणि फ्रंटलाइन कॅपिटल सर्व्हिसेसना सेबीकडून म्युच्युअल फंड परवान्यांसाठी तत्त्वतः मान्यता मिळाली आहे.
भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात सध्या सुमारे 45 कंपन्या आहेत आणि आणखी कंपन्या या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. अलीकडच्या काळात भारतात या क्षेत्रातही एकत्रीकरण दिसून आले आहे. डिसेंबरमध्ये, एचएसबीसी होल्डिंग्स Plc च्या भारतीय मालमत्ता व्यवस्थापन युनिटने L&T फायनान्स होल्डिंगचे म्युच्युअल फंड युनिट 3191 कोटी रुपयांना विकत घेण्यासाठी करार केला.
भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. Amfi डाटा नुसार, म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 30 नोव्हेंबर 2016 ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान 16.50 लाख कोटी रुपयांवरून 37.34 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. 5 वर्षांच्या कालावधीत त्यात दुप्पट वाढ झाली आहे.
हे ही वाचा:
- PAN Link To LIC Policy : तुमचे पॅन कार्ड 'असे' करा तुमच्या एलआयसी पॉलिसीसोबत लिंक
- अर्थसंकल्पानंतर लवकरच येणार या 'फार्मा' कंपनीचा IPO, पाच हजार कोटी रुपये उभारण्याची तयारी
- Adani Wilmar IPO: अदानी समूहात गुंतवणूक करण्याची संधी, आजपासून Wilmar आयपीओ खुला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha