अर्थसंकल्पानंतर लवकरच येणार या 'फार्मा' कंपनीचा IPO, पाच हजार कोटी रुपये उभारण्याची तयारी
एमक्युअर फार्मास्युटिकल्स ही देशातील 12वी सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी आहे. कंपनी आयपीओच्या रकमेपैकी 947 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे.
Emcure Pharmaceuticals IPO : एमक्युअर फार्मास्युटिकल्स (Emcure Pharmaceuticals) कंपनीचा आयपीओ बाजारात आणणार आहे. या आयपीओद्वारे 5,000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची तयारी कंपनीने केली आहे. कंपनीच्या ड्राफ्ट पेपरला सेबीकडून आधीच मंजुरी मिळाली आहे आणि आता ते रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल करण्याची तयारी करत आहे.
आयपीओच्या अंतर्गत कंपनी 1100 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करेल, तर उर्वरित 3,900 कोटी रुपये प्रवर्तक आणि शेअर होल्डर्ससाठी ऑफर-फॉर-सेलद्वारे आणले जातील. ऑफर-फॉर-सेल अंतर्गत कंपनीचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सतीश मेहता आणि त्यांचा मुलगा सुनील मेहता त्यांचे स्टेक विकणार आहेत. दोघांची कंपनीत अनुक्रमे 41.92 टक्के आणि 6.13 टक्के हिस्सेदारी आहे.
ओएफएसमध्ये सहभागी होणार्या इतर प्रवर्तक/शेअरहोल्डर्समध्ये जागतिक खाजगी इक्विटी फर्म बेन कॅपिटलचा समावेश आहे, ज्याच पुणे-मुख्यालय असलेल्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये 13.09 टक्के हिस्सा आहे. या व्यतिरिक्त, इतर अनेक लहान प्रवर्तक गट आणि व्यक्ती देखील या ऑफर-फॉर-सेलमध्ये सहभागी होतील, ज्यांचे कंपनीमध्ये एकत्रितपणे 33.55 टक्के हिस्सा आहे.
एमक्युअर फार्मास्युटिकल्स ही देशातील 12वी सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी आहे. कंपनी आयपीओच्या रकमेपैकी 947 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. मार्च 2021 पर्यंत कंपनीवर 1,256.6 कोटी रुपयांचे कर्ज होते. कंपनीच्या आयपीओशी संबंधित मर्चंट बँकर्सच्या माहितीनुसार हा आयपीओ बजेटच्या काही दिवसांनी पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.
मार्च 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, या श्रेणींमध्ये अनुक्रमे 51.53 टक्के, 11.85 टक्के आणि 10.26 टक्के मार्केट शेअरसह एमक्योर फार्मास्युटिकल्स एचआयव्ही अँटीव्हायरल, स्त्रीरोगविषयक औषधे आणि रक्ताशी संबंधित थेरपी विभागांमध्ये बाजारातील आघाडीवर आहे.त्याच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ओरल, इंजेक्टेबल आणि बायोलॉजिक्स तसेच mRNA प्लॅटफॉर्मचा समावेश आहे, जिच्याद्वारे ते कोविड-19 लस विकसित करत आहे, ज्यामुळे युरोप आणि कॅनडामध्ये मजबूत उपस्थिती असल्याने 70 हून अधिक देशांमध्ये बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यास सक्षम केले आहे.
एमक्योर फार्मास्युटिकल्सचा महसूल FY21 मध्ये Rs 6,091.8 कोटी, FY22 मध्ये Rs 5,130.8 कोटी आणि FY2119 मध्ये Rs 4,815.6 कोटी होता. त्याच वेळी, या वर्षांमध्ये तिचा निव्वळ नफा अनुक्रमे रु. 418.6 कोटी, रु. 100.6 कोटी आणि रु. 202.9 कोटी होता.
संबंधित बातम्या :
एथनिक वेअर कंपनी 'फॅब इंडिया' आयपीओसाठी कागदपत्रं देणार, आयपीओतून कंपनीला 20 हजार कोटी मूल्यांकन अपेक्षित
Delhivery, रेडियंट कॅश मॅनेजमेंट आणि व्हरांडा लर्निंग सोल्युशन्सच्या IPOला ग्रीन सिग्नल
सेबीकडून आयपीओशी संबंधित नियमात केला बदल, कंपन्यांच्या आयपीओतून होणाऱ्या नफेखोरीला चाप