PAN Link To LIC Policy : तुमचे पॅन कार्ड 'असे' करा तुमच्या एलआयसी पॉलिसीसोबत लिंक
घरी बसून सहजपणे तुम्ही तुमचे पॅन कार्ड तुमच्या LIC पॉलिसीशी लिंक करू शकता. एलआयसी पॉलिसीशी पॅन कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. हे काम तुम्ही मोबाईलच्या मदतीने घरी बसून सहज करू शकता.
PAN Link To LIC Policy : आपली अनेक महत्त्वाची कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर पॅन कार्डशी जोडली जात आहेत. ही महत्त्वाची कागदपत्रे पॅनकार्डशी जोडण्यासाठी अनेकवेळा सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. यात वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होतो. परंतु, आता तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. कारण आज आम्ही तुम्हाला घरी बसून सहजपणे तुम्ही तुमचे पॅन कार्ड तुमच्या LIC पॉलिसीशी कसे लिंक कराल? याबाबत सांगणार आहोत.
एलआयसी पॉलिसीशी पॅन कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यामध्ये तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही. हे काम तुम्ही तुमच्या मोबाईलच्या मदतीने घरी बसून सहज करू शकता. एलआयसी पॉलिसी पॅन कार्डशी लिंक करताना तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी क्रमांक, नोंदणीकृत (रजिस्टर) मोबाइल नंबर आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही ही प्रक्रिया यशस्वीपणे करू शकाल.
अशी करा तुमची एलआयसी पॉलिसी पॅन कार्डशी लिंक करा
एलआयसी पॉलिसीशी पॅन कार्ड लिंक करण्यासाठी, तुम्हाला https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/ या वेबसाईटला भेट द्या.
हे केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक पेज ओपन होईल. त्या पेजवर विचारलेली सर्व माहिती भरा. यामध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख, पॅन कार्ड तपशील, ईमेल आयडी, तुमचे नाव आणि मोबाईल नंबर भरावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमचा एलआयसी पॉलिसी क्रमांक टाकावा लागेल. नंबर टाकल्यानंतर त्याखाली आलेला कॅप्चा कोड भरा. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. बॉक्समध्ये OTP भरल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा. आता पॉलिसीसह लिंक पॅन - पावतीचे एक पृष्ठ तुमच्या स्क्रीनवर उघडेल, ज्यावर प्राप्त झालेल्या पॅन नोंदणीसाठी विनंती लिहिलेली असेल. म्हणजे तुमची विनंती मान्य झाली आहे. या प्रक्रियेच्या मदतीने तुम्ही काही वेळातच तुमचे पॅन कार्ड LIC पॉलिसीशी लिंक करू शकता.
महत्वाच्या बातम्या