(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIC IPO चे मोठे अपडेट! 4 मे रोजी बाजारात दाखल होणार आयपीओ, पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या ही माहिती
LIC IPO Update: तुम्हीही LIC च्या IPO ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दीर्घकाळापासून गुंतवणूकदार एलआयसीच्या आयपीओची आतुरतेने वाट पाहत होते.
LIC IPO Update: तुम्हीही LIC च्या IPO ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दीर्घकाळापासून गुंतवणूकदार एलआयसीच्या आयपीओची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच आज आयपीओची तारीख जाहीर झाली आहे. असे बोलले जात आहे की, 4 मे रोजी कंपनी आपला आयपीओ बाजारात आणणार आहे. IPO कोणत्या दिवशी ओपन होईल आणि तो बाजारात कधी लिस्ट होणार हे जाणून घेऊ.
LIC IPO शी संबंधित तपशील:
27 एप्रिल - प्राइस बँड जाहीर केला जाऊ शकतो
29 एप्रिल - अँकर गुंतवणूकदारांसाठी वाटप
4 मे - IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल
9 मे - सदस्यत्वाची शेवटची तारीख
12 मे - इक्विटी शेअर्स डिपॉझिटरी खात्यांमध्ये जमा केले जाऊ शकतात
13 मे - मार्केटमध्ये लिस्टिंग होऊ शकते
किती शेअर्स होणार जारी
या IPO च्या माध्यमातून कंपनी 22,13,75,000 शेअर जारी करेल.
इश्यूची किंमत किती असेल?
शेअर्सची इश्यू किंमत 950-1000 रुपयांच्या दरम्यान असू शकते.
लॉटचा साइज किती असेल?
याशिवाय जर आपण लॉट साइजबद्दल बोललो तर LIC IPO च्या एका लॉटमध्ये 15 शेअर्स असू शकतात.
सरकार 21000 कोटी उभारणार
सरकार या IPO द्वारे सुमारे 21000 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) मधील सुमारे 3.5 टक्के हिस्सा विकण्याचा सरकारचा विचार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- आज रात्री बदलणार ट्विटरचे मालक! एलन मस्क यांची डील जवळपास फिक्स
- गौतम अदानींचा नवा रेकॉर्ड, वॉरेन बफेट यांना मागे टाकत जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती
- आरबीआयने 'बँक ऑफ महाराष्ट्रला' ठोठावला इतक्या कोटींचा दंड, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
- GST Rates Hike : आधीच महागाईचा मार, आणखी वाढणार खिशावरचा भार? GST परिषदेकडून 143 वस्तूंच्या किमती वाढवण्याची शिफारस
- Crude Oil Import : भारताचा तेल आयातीवरील खर्च दुप्पट; कच्च्या तेलाच्या आयातीसाठी 'इतके' अब्ज डॉलर खर्च