गौतम अदानींचा नवा रेकॉर्ड, वॉरेन बफेट यांना मागे टाकत जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती
Gautam Adani : जगातील सर्वात 10 श्रीमंत लोकांपैकी हे अदानी आणि अंबानी हे दोन भारतीय आहेत.
World Richest People : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी नवे स्थान प्राप्त केले आहे. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार अदानी आता जगातील पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती बनले आहे. अदानी यांची एकूण संपत्ती 123.3 अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांनी वॉरन बफेट यांना मागे टाकून पाचवा स्थानी ते विराजमान झाले आहेत
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आठव्या स्थानावर आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात 10 श्रीमंत लोकांपैकी हे अदानी आणि अंबानी हे दोन भारतीय आहेत.
इलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
या यादीत टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत. त्याची एकूण संपत्ती 269.70 अब्ज डॉलर्स इतकी आहे. जेफ बेझोस 170.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नॉल्ट आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 166.8 अब्ज डॉलर्स एवढी आहे आणि या यादीत ते तिसरे आहेत
हे जगातील टॉप 10 श्रीमंत लोक आहेत
1 | इलॉन मस्क | $269.7 अब्ज |
2 | जेफ बेझोस | $170.2 अब्ज |
3 | बर्नार्ड अर्नॉल्ट | $166.8 अब्ज |
4 | बिल गेट्स | $130.2 अब्ज |
5 | गौतम अदानी | $ 123.2 अब्ज |
6 | वॉरेन बफेट | $121.7 अब्ज |
7 | लॅरी एलिसन | $107.6 अब्ज |
8 | मुकेश अंबानी | $103.7 अब्ज |
9 | लॅरी पेज | $102.4 अब्ज |
10 | सेर्गे ब्रिन | $98.5 अब्ज |
अदानी पॉवर ही अदानी समूहाची सहावी अशी कंपनी आहे जिचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. २५ एप्रिलच्या शेअर बाजाराच्या व्यवहारात या कंपनीचा शेअर रु. 270.80 वर गेला असून हा आतापर्यंतचा या शेअरचा उच्चांक ठरला आहे. या वर्षी आतापर्यंत हा स्टॉक 165% पेक्षा जास्त चालला आहे, तर या महिन्यात या स्टॉकमध्ये 46% वाढ झाली आहे.
याआधी अदानी ग्रॅन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या अदानी समूहाच्या कंपन्या आहेत ज्यांनी 1 लाख कोटी रुपयांचा मार्केट कॅप गाठला आहे.