LIC IPO : 'या' दिवशी येऊ शकतो LIC IPO, इतक्या शेअर्सचा असणार लॉट
LIC IPO Details : गुंतवणूकदार एलआयसी आयपीओची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. पुढील महिन्यात आयपीओ येणार असल्याची दाट शक्यता आहे.
LIC IPO : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना LIC आयपीओची प्रतिक्षा आहे. एलआयसीने त्यासाठी सेबीकडे प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्र सरकारला 31 मार्च आधी एलआयसीचा आयपीओ बाजारात आणायचा आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार एलआयसीचा आयपीओ 10 मार्च 2022 रोजी खुला होऊ शकतो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयसी आयपीओ 10 मार्च रोजी खुला (LIC IPO Open Date) होणार आहे. 14 मार्चपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येईल. LIC चा इश्यू साइज हा 65 हजार कोटी रुपयांचा असू शकतो. रिटेल गुंतवणूकदारांमध्ये LIC IPO बाबत अधिक उत्साह दिसून येत आहे.
प्रति शेअर किती किंमत?
एलआयसीच्या प्रति शेअरची किंमत ही 2000 ते 2100 रुपयांदरम्यान असू शकते. अप्पर प्राइस बॅण्डनुसार रिटेल गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी 14,700 रुपये भरावे लागतील. सात शेअरचा एक लॉट असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केंद्र सरकारकडून एलआयसी आयपीओच्या तारखेबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
5 टक्के हिस्सेदारी विकण्याची तयारी
सरकार एलआयसीमधील आपला 5 टक्के हिस्सा विकणार आहे. सेबीकडे सादर करण्यात आलेल्या दस्ताऐवजानुसार 31,62,49,885 जारी करण्यात येणार आहे.
LIC च्या मेगा IPO नंतर, ती रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) ला मागे टाकून मार्केट कॅपमध्ये देशातील सर्वात मोठी कंपनी बनणार आहे.
LIC पॉलिसीधारकांसाठी काही भाग राखीव
LIC पॉलिसीधारकांसाठी आयपीओत काही भाग राखीव ठेवण्यात आला आहे. आयपीओतील शेअर दरात पाच टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे एलआयसी पॉलिसीधारकांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- LIC IPO : एलआयसी विमाधारकांसाठी महत्त्वाची बातमी, LIC IPO अर्ज करण्याआधी 'हे' काम कराच
- LIC च्या आधी 'या' 10 कंपन्यांच्या IPO ची झाली होती चर्चा!
- आताच तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करा, नाहीतर भरावा लागेल हजारांचा दंड, शेवटची तारीख लवकरच...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha