LIC IPO : एलआयसी विमाधारकांसाठी महत्त्वाची बातमी, LIC IPO अर्ज करण्याआधी 'हे' काम कराच
LIC IPO Updates : LIC चा आयपीओ लवकरच शेअर बाजारात येणार आहे. एलआयसी विमाधारकांसाठी आयपीओमध्ये विशेष तरतूद असणार आहे.
LIC IPO Updates : LIC ने IPO लाँच करण्यासाठी SEBI कडे ड्राफ्ट पेपर (DRHP) दाखल केला आहे. तुम्हाला देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. एलआयसी विमाधारकांसाठी आरक्षित प्रवर्ग असणार आहे. याचा फायदा घेण्यासाठी काही गोष्टी तातडीने करण्याची आवश्यकता आहे.
28 फेब्रुवारीपूर्वी पॅन क्रमांक अपडेट करा
LIC ने SEBI कडे दाखल केलेल्या मसुद्यात असे म्हटले आहे की, जो पॉलिसीधारक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पॅन नंबर पॉलिसीशी लिंक करणार नाही, तो राखीव श्रेणीतील IPO साठी अर्ज करण्यास पात्र असणार नाही. LIC च्या DRPH नुसार, विमा पॉलिसीधारकाने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्याचा/तिचा पॅन तपशील आमच्या कॉर्पोरेशनच्या पॉलिसी रेकॉर्डमध्ये लवकरात लवकर अपडेट केला जाईल. ज्या पॉलिसीधारकाने आपले पॅन तपशील आमच्या कॉर्पोरेशनमध्ये अपडेट केले नाहीत त्यांना पात्र पॉलिसीधारक म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही.
फादर ऑफ ऑल आयपीओ
एलआयसीचा आयपीओ हा जवळपास 65 ते 75 हजार कोटींचा असू शकतो. सरकार एलआयसीतील 5 टक्के समभाग म्हणजेच शेअर विकणार आहेत. आणि यातून 65 ते 75 हजार कोटी उभारण्याचा मानस सरकारचा आहे. आतापर्यंत सर्वाधित मोठा आयपीओ हा नुकतीच लिस्टिंग झालेली पेटीएम कंपनी आहे. पेटीएम कंपनीचा आयपीओ हा 18 हजार 500 कोटी रुपयांचा होता. त्यामुळे एलआयसीच्या आयपीओला फादर ऑफ ऑल आयपीओ म्हटलं जातं आहे.
एलआयसीवर गुंतवणूकदारांच्या नजरा का?
एलआयसीचे 29 कोटी विमाधारक असून त्यांना आयपीओमध्ये स्वस्तात शेअर्स मिळवण्याची उत्तम संधी आहे. जवळपास 13 लाख एजंट आहेत. एका मोठ्या नेटवर्कमुळे एलआयसीच्या आयपीओला प्रतिसाद मिळण्याची दाट शक्यता आहे. एलआयसी आयपीओमध्ये तब्बल 31 कोटी 62 लाख शेअर्सची विक्री होणार आहे. एलआयसीच्या आयपीओमध्ये पॉलिसी होल्डर्ससाठी 10 टक्के कोटा असणार आहे. ज्या पॉलिसी होल्डर्सनं आपला पॅन नंबर एलआयसीकडे 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अपडेट केला आहे तेच या कोट्यासाठी पात्र असणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- LIC च्या आधी 'या' 10 कंपन्यांच्या IPO ची झाली होती चर्चा!
- TVS सप्लाय चेन सोल्युशन्स 5000 कोटींचा IPO आणणार
- झोस्टेलला आयपीओ येण्याआधी दणका, OYO मधील 7% स्टेकचं अपील फेटाळलं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha