(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Investment Tips: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनांमध्ये करा गुंतवणूक, मिळेल चांगला परतावा; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Post Office Saving Scheme: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अनेकदा नुकसानीचा सामना करावा लागतो.
Post Office Saving Scheme: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अनेकदा नुकसानीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत लोकांना पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक करायला आवडते. पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने, अधिक परतावा तसेच सुरक्षा मिळते. हे आपल्या ग्राहकांचे भविष्य सुरक्षित ठेवते. चला तर मग पोस्ट ऑफिसच्या काही खास योजनांबद्दल माहिती जाणून घेऊ, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला ठराविक कालावधीनंतर चांगला परतावा मिळू शकतो...
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (TD) योजनेत गुंतवणूक करा
टाईम डिपॉझिट (TD) पोस्ट ऑफिसची अशी स्कीम आहे, ज्यामध्ये तुम्ही 1 ते 5 वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही 1,000 रुपयांपर्यंत खाते उघडू शकता. यामध्ये गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 5.5 टक्के ते 6.7 टक्के परतावा मिळेल.
मासिक गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करा (Monthly Investment Scheme)
तुम्हाला दर महिन्याला निश्चित परतावा मिळवायचा असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मासिक गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करू शकता. यात तुम्हाला 6.6 टक्के व्याजदर मिळतो. या योजनेअंतर्गत 1,000 रुपयांपर्यंतचे खाते उघडता येते. यामध्ये तुम्ही एका खात्यावर 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यावर 9 लाख रुपये जमा करू शकता. यात तुम्हाला जमा केलेली रक्कम 5 वर्षांनी मिळेल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) मध्ये गुंतवणूक करा
या योजनेत तुम्ही 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.4 टक्के परतावा मिळेल. यामध्ये तुम्ही 1,000 ते 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. वयाच्या 60 नंतरच तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता.
इतर महत्वाच्या बातम्या:
Investment Tips: विनाजोखीम आणि चांगला परतावा; पोस्ट ऑफिसच्या 'या' गुंतवणूक योजना फायदेशीर
पोस्ट ऑफिसच्या 'या' गुंतवणूक योजना फायदेशीर, जाणून घ्या
Post Office : पोस्ट ऑफिसमध्येही RTGS आणि NEFT सेवांचा लाभ मिळणार, तपशील जाणून घ्या