एक्स्प्लोर
पोस्ट ऑफिसच्या 'या' गुंतवणूक योजना फायदेशीर, जाणून घ्या
India Post Office Investment Schemes पोस्ट ऑफिसच्या 'या' गुंतवणूक योजना फायदेशीर, जाणून घ्या
1/6

Different Schemes of Post Office: वाढती महागाई, रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळले आहेत. अनेकांचा कल कमी अथवा विना जोखीम असलेल्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करण्याकडे वाढला आहे. विना जोखीम आणि चांगला परतावा हवा असल्यास पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे.
2/6

National Pension System ही केंद्र सरकारची पेन्शन योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर निवृत्तीच्या वेळी एकरकमी पैसे मिळतात. या योजनेतील गुंतवणुकीवर Income Tax return Filing मध्ये 80 सी नुसार सवलत मिळते.
3/6

तुम्ही तुमच्या मुलींसाठी गुंतवणुकीसाठी विचार करत असाल तर सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) यामध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्ही दरवर्षी 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. यामध्ये तुम्हाला 80 C नुसार आयकरात सवलत मिळू शकते. या या योजनेत तुम्हाला 7.6 टक्के इतका व्याज दर मिळतो.
4/6

Public Provident Scheme मध्ये तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला गुंतवणूक केल्यास 7.1 टक्के परतावा मिळतो. त्याशिवाय आयकरात 80 C नुसार सवलत मिळते.
5/6

किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) या गुंतवणूक योजनेत तुम्हाला 6.9 टक्के या व्याज दराने परतावा मिळतो. मात्र, तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळत नाही. या योजनेत गुंतवणूक केल्यास 124 महिन्यानंतर दुप्पट परतावा मिळतो.
6/6

National Saving Certificate या योजनेत गुंतवणूक केल्यास 6.8 टक्क्यांचा परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही पाच वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला आयकरात 80 C नुसार, सवलत मिळते.
Published at : 07 Jun 2022 05:23 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
विश्व
भारत
व्यापार-उद्योग


















