एक्स्प्लोर

BSE आणि NSE निर्देशांकांत मोठी घसरण, गुंतवणूकदारांना फटका; नेमकं कारण काय?

इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसला. आज बाजार चालू असताना अनेक कंपन्यांचे शेअर्स गडगडले.

मुंबई : इराण-इस्रायल (Iran Israel War) यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगावर चिंतेचे सावट उमटले आहे. जगातले अनेक देश या युद्धामुळे चिंतेत आहेत. दरम्यान, या युद्धासह वेगवेगळ्या जागतिक घडामोडींचा परिणाम जगभरातील शेअऱ बाजारावर (Indian Stock Market) होत आहे. भारतातील शेअर बाजारालाही त्याचा मोठा फकटा बसला आहे. आज भांडवली बाजाराच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

आज भांडवली बाजाराची स्थिती काय? 

आज भांडवली बाजाराच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात हाहा:कार उडाला. सकाळी बाजारातील व्यवहार चालू होताच सेन्सेक्समध्ये 727 अंकांची घसरण पाहायला मिळाली. त्यानंतर बाजार हळूहळू सावरला. आज सेन्सेक्सने सर्वाधिक 73, 905.80 पर्यंत उभारी घेतली होती. मात्र आता दिवसाअखेर सेन्सेक्स 845.12  अंकांच्या घसरणीसह  73399.78 अंकांवर स्थिरावला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सेक्सेक्स 74244.90 अंकांवर स्थिरावला होता. म्हणजेच शुक्रवारच्या तुलनेत आज सेन्सेक्समध्ये 1.14 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.

निफ्टी 50 ची स्थिती काय?

निफ्टीचीही अशिच स्थिती आहे. शुक्रवारी निफ्टी निर्देशांक 22519.40 वर बंद झाला होता. आज बाजाराच्या शेवटी निफ्टीमध्ये शुक्रवारच्या तुलनेत 1.10 टक्के म्हणजेच 246.90 अंकांची घसरण पाहायला मिळाली. दिवसाअखेर निफ्टी 22272.50 अंकांवर स्थिरावला. 

या कंपन्यांना बसला फटका 

सोमवारी शेअर बाजारात हाहा:कार पाहायला मिळाला. निर्देशांक गडगडल्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स गटांगळ्या खाऊ लागले. यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचाही समावेश आहे. या कंपनीचे शेअर्स 4.8 टक्क्यांनी पडले आहेत. सध्या या कंपनीच्या शेअर्सची किंमत 354.30 आहे. अदाणी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy Stock) कंपनीचा शेअरदेखील 3.66 टक्के खसरून 1815 रुपयांवर स्थिरावला. आयआरएफसी शेअरही (IRFC Share) 3.48 टक्क्यांपर्यंत खाली आला. सध्या या शेअरची किंमत 140.25 रुपये आहे. या कंपन्यांसह इराण- इस्रायल युद्धामुळे सध्या शेअर बाजाराची स्थिती नाजूक झाली आहे. या स्थितीत अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.

स्मॉल कॅप कंपन्यांनाही फटका 

स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्सही आज घसरल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये सर्वाधिक फटका एनबीबीसीला (इंडिया) बसला आहे. या कंपनीच्या शेअर्सचे मूल्य 5.73 टक्क्यांनी घटले. सध्या या कंपनीच्या एका शेअरचे मूल्य 125.95  आहे. केईसी इंटरनॅशनलचे (KEC International Stock) शेअर्स 5.71 टक्क्यांनी घरंगळून 704.10 रुपयांवर स्थिरावले. कॅस्ट्रॉल इंडिया (Castrol India Share) कंपनीचा शेअरदेखील 5.66 टक्क्यांनी कमी होत 210.80 रुपयांवर बंद झाला.

हेही वाचा :

डोळे नाहीत, दिसत नाही, शिक्षणासाठी खाल्ल्या खस्ता; आज उभी केली 500 कोटींची कंपनी; कोण आहेत श्रीकांत बोला?

आता 'टेस्ला'च्या कारमध्ये 'टाटा'च्या चीप, भारतात येण्याआधी एलॉन मस्क यांनी केला मोठा करार!

हिऱ्याच्या आकाराचा आलिशान बंगला, महागड्या गाड्या, शेतकरीपुत्र हजारो कोटींचा मालक कसा झाला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सShashikant Shinde meet Ajit Pawar : नागपुरातील निवासस्थानी शशिकांत शिंदे-अजित पवार भेटTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
IPO : MobiKwik, विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेसचे आयपीओ लिस्ट होणार, गुंतवणूकदार मालामाल होणार,GMP कितीवर? 
शेअर बाजारात 3 मेनबोर्ड आयपीओचं लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल होणार, GMP कितीवर?
EPFO :पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, व्याजदराबाबत नवी अपडेट, ईपीएफओ मोठ्या निर्णयाच्या तयारीत 
मोठी बातमी, पीएफ खातेदारांना दिलासा मिळणार, व्याजदराबाबत मोठी अपडेट, ईपीएफओची विशेष रणनीती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Embed widget