(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिलासादायक! देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात वाढ, सर्वात जास्त वृद्धी नोंदवलेले घटक कोणते?
औद्योगिक क्षेत्रासाठी (Industrial एाएक महत्वाची बातमी समोर आली आहे. मार्च 2024 मध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात 4.9 टक्के इतका झाला आहे. मागील महिन्याच्या तुलनेत निर्देशांकात घट झालीय.
Index of Industrial Production : औद्योगिक क्षेत्रासाठी (Industrial एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मार्च 2024 मध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात 4.9 टक्के इतका झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च 2023 च्या तुलनेत मार्च 2024 या महिन्यासाठी खाणकाम, उत्पादन आणि वीज या तीन क्षेत्रांचा वृद्धीदर अनुक्रमे 1.2 टक्के, 5.2 टक्के आणि 8.6 टक्के इतका झाला आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील वाढ ही फेब्रुवारी महिन्यात 5.6 टक्के होती. त्या तुलनेत मार्च महिन्यात औद्योगिक क्षेत्रातील वाढ मंदावली आहे. पाहुयात सविस्तर माहिती.
खाणकाम, उत्पादन आणि वीज या क्षेत्रांच्या औद्योगिक निर्देशांक किती?
मार्च 2024 या महिन्यासाठी, 2011-12 आधारभूत वर्षासह औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचे (आयआयपी) जलद अनुमान 159.2 इतके आहे. मार्च 2024 साठी खाणकाम, उत्पादन आणि वीज या क्षेत्रांचे औद्योगिक उत्पादन निर्देशांक अनुक्रमे 156.1, 155.1 आणि 204.2 इतके आहेत. मार्च 2024 मधील आयआयपी वाढीचा दर मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 4.9 टक्के इतका आहे. मार्च 2023 च्या तुलनेत मार्च 2024 या महिन्यासाठी खाणकाम, उत्पादन आणि वीज या तीन क्षेत्रांचा वृद्धी दर अनुक्रमे 1.2 टक्के, 5.2 टक्के आणि 8.6 टक्के इतका आहे. मागील महिन्याच्या तुलनेत निर्देशांकात थोडी घट झाली आहे.
खाणकाम क्षेत्राच्या उत्पादनवाढीत घसरण
उत्पादन क्षेत्रात मार्च 2024 मध्ये, "मूलभूत धातूंचे उत्पादन 7.7 टक्के, औषधे आणि औषधी रसायने आणि वनस्पतिजन्य उत्पादनांचे उत्पादन 16.7 टक्के आणि इतर वाहतूक उपकरणांचे उत्पादन 25.4 टक्के आहे. या तीन घटकांनी सर्वात जास्त वृद्धी नोंदवली आहे. आयआयपी वाढीसाठी सकारात्मक योगदान दिले आहे.
एप्रिल ते मार्च 2023-24 या कालावधीतील वृद्धीदर मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 5.8 टक्के इतका आहे. एप्रिल ते मार्च 2023-24 या कालावधीसाठी खाणकाम, उत्पादन आणि वीज या तीन क्षेत्रांचा एकत्रित वृद्धी दर मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत अनुक्रमे 7.5 टक्के, 5.5 टक्के आणि 7.1 टक्के इतका आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक मानला जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील वाढ फेब्रुवारी महिन्यात 5.6 टक्के होती. मार्चमध्ये त्यात घट होऊन ती 4.9 टक्क्यांवर आली आहे. खाणकाम क्षेत्राच्या उत्पादनातील वाढ मार्चमध्ये 1.2 टक्के नोंदवण्यात आली आहे. ती गेल्या वर्षी मार्चमधील 6.8 टक्क्यांच्या तुलनेत यंदा मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Jobs Updates: आयटी क्षेत्रात भरती घटली, तर रिअल इस्टेटसह या क्षेत्रातील रोजगारात वाढ: सर्वे