एक्स्प्लोर

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा

Astrological Tips : पैशाची तंगी असेल किंवा नकारात्मक ऊर्जा दूर करून सुख-समृद्धीची कामना करण्यासाठी काही सोप्या उपायांनी तुम्ही लक्ष्मी मातेला प्रसन्न करु शकता.

Astrological Tips : भारतात अनेक रुढी-परंपरा आहेत. यासोबत श्रद्धेलाही महत्त्व आहे. भारतात अनेक धार्मिक श्रद्धा पाळल्या जातात. त्यांना अत्यंत महत्त्व दिलं जातं. अनेक लोक वैदिक शास्त्रावर विश्वास ठेवतात. ज्योतिषशास्त्राचा रोजच्या जीवनात वापर केल्यास चांगले आरोग्य, सुख-समृद्धी वाढते, संपत्ती आणि नातेसंबंध वृद्धींगत होतात आणि करिअरसाठीही चांगल्या संधी उपलब्ध होतात, असं मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, काही गोष्टी केल्याने तुम्हाला आयुष्यात, यश पैसा आणि प्रसिद्धी मिळविण्यास मदत होऊ शकते. दैनंदिन जीवनात काही गोष्टींचा अवलंब केल्याने तुमचं भाग्य उजळतं असं मानलं जातं. अंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिसळल्यास तुमच्या मनाप्रमाणे यश मिळून ध्येय साध्य होण्यास मदत होते, असं सांगितलं जातं.

पाण्यात या पाच वस्तू मिसळून अंघोळ करा

पाण्यासंबंधित हे उपाय तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्याही दूर करण्यास मदत करतात. या काही छोट्या-छोट्या उपायांनी तुम्ही तुमचं जीवन सुधारू शकता आणि तुमच्या आयुष्यातील अशुभ समय दूर करू शकता, असं सांगितलं जातं. दररोज अंघोळीच्या पाण्यात वेगवेगळ्या गोष्टी टाकून तुम्ही तुमचं भाग्य उजळू शकता. अंघोळीच्या पाण्यात आणि कोणत्या दिवशी, कोणत्या वस्तू टाकाव्यात, हे जाणून घ्या.

अंघोळीच्या पाण्यात या गोष्टी टाका ( Put These 5 things in Bathing Water )

मीठ

आठवड्यातून दोन दिवस आंघोळीच्या पाण्यात मीठ टाका. मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्यासाठी मंगळवार आणि शनिवार हे अतिशय शुभ दिवस आहेत. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. मीठ नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेते.

दूध

सोमवारी आंघोळीच्या पाण्यात दूध टाकल्याने मानसिक शांती मिळते. हे करणे खूप शुभ मानलं जातं.

हळद

गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्याने गुरू ग्रह मजबूत होतो, असं सांगितलं जातं. यामुळे तुमच्या त्वचेवरही तेज येते. तसेच हळदीच्या पाण्याने स्नान केल्याने संपत्ती वाढते, असं मानलं जातं.

परफ्यूम

शुक्रवारी अंघोळीच्या पाण्यात सुगंधी द्रव्य टाकून आंघोळ केल्याने तुमच्याकडील आकर्षण वाढते. दर शुक्रवारी असे केल्यास याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

गुलाबजल

याशिवाय, शुक्रवारी अंघोळीच्या पाण्यात गुलाबजल टाकल्याने शरीर मजबूत होते. तसेच, गुलाब पाण्याने अंघोळ केल्याने जीवनातील सर्व सुखसोयी आणि सुखसुविधा मिळतात.

या सर्व 5 गोष्टी तुम्हाला तुमच्या घरात किंवा स्वयंपाकघरात नेहमी सहज सापडतील. पण, जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात या गोष्टी टाकून आंघोळ केली तर या चमत्कारिक उपायांमुळे तुमचं जीवन सुख-समृद्धी मिळून संपत्तीत भरभराट होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींसाठी ऑगस्टचा नवीन आठवडा संकटाचा; कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा, साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींसाठी ऑगस्टचा नवीन आठवडा संकटाचा; कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा, साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरात 'या' देवांच्या मूर्ती किंवा फोटो चुकूनही ठेवू नये? कोणत्या देवांच्या मूर्ती ठेवाव्यात? धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात 'या' देवांच्या मूर्ती किंवा फोटो चुकूनही ठेवू नये? कोणत्या देवांच्या मूर्ती ठेवाव्यात? धार्मिक मान्यता सांगते...
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget