एक्स्प्लोर
शेअर बाजारावर 'हे' पाच शेअर्स ठरणार किंग, महिन्याभरात गुंतवणूकदार होणार मालामाल?
अॅक्सिस डायरेक्ट या ब्रोकरेज फर्मने पाच स्टॉक्स सुचवले आहेत. हे स्टॉक्स महिन्याभरात चांगले रिटर्न्स देऊ शकतात, असा अंदाज अॅक्सिस डायरेक्टने व्यक्त केला आहे.

five stock for good returns (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/8

Stocks to BUY: अॅक्सिस डायरेक्ट या ब्रोकरेज फर्मने पोझिशनल ट्रेडर्ससाठी आगामी 15-30 दिवसांसाठी 5 शेअर्स सुचवले आहेत. अॅक्सिस डायरेक्टच्या मतानुसार या शेअर्समध्ये सध्या चांगले मुमेंटम आहे. त्यामुळे या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो, असे अॅक्सिस डायरेक्टला वाटते.
2/8

अॅक्सिस डायरेक्टने Clean Science या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या या कंपनीच्या शेअरचे मूल्य 1395 रुपये आहे. शेअर खरेदी करताना 1500 रुपयांचे टार्गेट ठेवायला हवे. तर 1292 रुपयांचा स्टॉप लॉस लावायला हवा, असे अॅक्सिस डायरेक्टला वाटते.
3/8

Finolex Industries या कंपनीच्या शेअरचे सध्याचे मूल्य 314 रुपये आहे. हा शेअर 304-309.5 रुपयांपर्यंत आल्यास तो खरेदी करण्याचा सल्ला अॅक्सिस डायरेक्टने दिला आहे. तसेच शेअर्स खरेदी केल्यास 369 रुपयांचे टार्गेट तर 300 रुपयांचा स्टॉप लॉस लावावा, असा सल्लाही अॅक्सिस डायरेक्टने दिला आहे.
4/8

DB Corp या कंपीचा शेअर 293 रुपयांवर आहे. 287-293 रुपयांपर्यंत आल्यावर या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. तसेच 326 रुपयांचे टार्गेट तर 282 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा, असे अॅक्सिस डायरेक्टने सुचवले आहे.
5/8

Gabriel India या कंपनीच्या शेअरचे मूल्य सध्या 379 आहे.. 375-378 रुपयांच्या रेंजमध्ये या कंपनीचे शेअर खरेदी करावेत. त्यासाठी 417 रुपयांचे टार्गेट तर 365 रुपयांचा स्टॉप लॉस लावावा, असे अॅक्सिस डायरेक्टने म्हटलं आहे.
6/8

UPL कंपनीच्या शेअरचे मूल्य सध्या 516 रुपये आहे. 513-518 रुपयांच्या रेंजमध्ये आपण हा शेअर खरेदी करावा. त्यासाठी 554 रुपयांचे टार्गेट ठेवावे तर 506 रुपयांचा स्टॉपलॉस लावावा, असे अॅक्सिस डायरेक्टने सुचवले आहे.
7/8

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
8/8

image 8
Published at : 23 May 2024 11:46 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
क्रीडा
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion