Travel Insurance : उड्डाणाला विलंब किंवा फ्लाईट रद्द झाल्यास ट्रॅव्हल इन्शुरन्स कसा वापरायचा? त्यात काय मिळतात मिळतात?
Flight Delay or Cancelation : सध्या दाट धुक्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत ट्रॅव्हल इन्शुरन्समधून कोणत्या सुविधा मिळतात हे जाणून घेतले पाहिजे.
![Travel Insurance : उड्डाणाला विलंब किंवा फ्लाईट रद्द झाल्यास ट्रॅव्हल इन्शुरन्स कसा वापरायचा? त्यात काय मिळतात मिळतात? How to use travel insurance in case of flight delay or cancellation What facilities are available in plane travel airport marathi news Travel Insurance : उड्डाणाला विलंब किंवा फ्लाईट रद्द झाल्यास ट्रॅव्हल इन्शुरन्स कसा वापरायचा? त्यात काय मिळतात मिळतात?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/17/bd5b4a54f13fd2fbc30fefa2e9bb1c621705468786200938_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Flight Delay or Cancelation : धुक्यामुळे तुमच्या फ्लाईटला उशीर झाला किंवा ती रद्द झाली तर काळजी करण्याची गरज नाही. तुमचा प्रवास विमा म्हणजेच ट्रॅव्हल इन्शुरन्सच्या (Travel Insurance) माध्यमातून तुम्हाला यामध्ये अनेक सुविधा मिळू शकतात. फ्लाईटला बराच काळ विलंब झाल्यास ट्रॅव्हल इन्शुरन्सच्या माध्यमातून तुम्हाला रात्रीच्या मुक्कामासाठी हॉटेलची सुविधा मिळते, तसेच नवीन तिकिटही मिळू शकते.
गेल्या बुधवारी धुक्यामुळे एकूण 120 उड्डाणे वेळेवर उडू शकली नाहीत. याशिवाय धुके आणि इतर कारणांमुळे 53 उड्डाणेही रद्द करावी लागली होती. यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांचा समावेश आहे.
12 तासांपेक्षा जास्त विलंब झाल्यास अनेक फायदे
दरवर्षी हिवाळ्यात धुक्यामुळे विमान प्रवासामध्ये अडचणी निर्माण होतात. उड्डाणे अनेक तास उशीरा होतात. त्यामुळे प्रवाशांमध्येही संताप वाढत आहे. विमान उड्डाणााला विरोध झाल्यामुळे अलीकडेच एका प्रवाशाने वैमानिकावर हल्ला केला. याशिवाय प्रवाशांनीही हवाई पट्टीच्या बाजूला बसून जेवायला सुरुवात केली होती. हिवाळ्यात असे दृश्य सामान्य झाले आहेत. अशा परिस्थितीत तुमचा प्रवास विमा उपयोगी येतो. फ्लाइटला 12 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास किंवा रद्द केल्यास तुमचे पैसे परत केले जातात. याशिवाय तुमची राहण्याची व्यवस्थाही विम्याच्या माध्यमातून केली जाईल. याशिवाय तुम्ही दुसऱ्या फ्लाइटचे तिकीट देखील मिळवू शकता.
उड्डाण विलंब किंवा रद्द झाल्यास या सुविधा उपलब्ध असतील
लाईव्ह मिंटच्या एका अहवालानुसार, तुम्हाला मिळणाऱ्या सुविधा प्रत्येक विमा कंपनीच्या योजनेवर अवलंबून असतात. फ्लाइट रद्द किंवा उशीर झाल्यास तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. प्रवास विमा केवळ अपघातांपासून तुमचे रक्षण करत नाही तर फ्लाईटला विलंब झाला किंवा ती रद्द झाली तर अशा घटनांमध्ये तुम्हाला सुविधा देखील पुरवतो. पण त्यासाठी तुमच्या पॉलिसीमध्ये धुके किंवा खराब हवामानाशी संबंधित तरतुदी असाव्यात.
फ्लाईटला विलंब झाल्यास किंवा ती रद्द झाल्यास झालेला प्रवास खर्च परत मिळेल. फ्लाईटला काही तास उशीर झाल्यास, प्रवास विमा तुम्हाला कोणताही लाभ देऊ शकत नाही. त्यासाठी उड्डाणाच्या विलंबाबाबत धोरणात काय तरतुदी आहेत हे आधीच पाहावं लागेल.
विमान कंपनीने सुविधा दिल्यास विमा कंपनी लाभ देणार नाही
जर तुम्हाला विमान कंपनीकडून याआधी लाभ मिळाले असतील तर विमा कंपनी कोणतीही सुविधा देणार नाही. विलंब झाल्यास पॉलिसी अंतर्गत तुम्हाला निवास आणि भोजनाची सुविधा मिळेल की नाही हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. याशिवाय तिकीट रद्द झाल्यास किती रक्कम कापली जाईल याचीही माहिती असावी.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)