एक्स्प्लोर

Gold Jewellery : सोन्या-चांदीचे दागिने महागणार? केंद्र सरकारने आयातकर वाढवला आणि उपकरही लावला

Gold Silver Jewellery : मौल्यवान धातू असलेल्या घटकांवर आयात शुल्क देखील वाढवण्यात आलं आहे. आता त्यावर 4.35 टक्के कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर म्हणजेच सेस (AIDC) लादण्यात आला आहे.

मुंबई: सोन्याच्या दागिन्यांच्या किमती (Gold Silver Jewellery) महागण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकारने सोने आणि चांदीच्या पिन, हूक आणि नाणी यांसारख्या फायडिंग्ज उत्पादनांवर आयात शुल्क वाढवले आहे. या सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तूंवरील आयात शुल्क आता 15 टक्के इतकं करण्यात आलं आहे. सरकारने या सर्वांवर पाच टक्के एआयडीसी (AIDC) म्हणजेच अॅग्रीकल्चर इन्फ्रा अॅंड डेव्हलपमेंट सेस म्हणजे उपकर लावला आहे. 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने (CBIC) एका अधिसूचनेत म्हटले आहे की मौल्यवान धातू असलेल्या घटकांवर आयात शुल्क देखील वाढविण्यात आले आहे. आता त्यावर 4.35 टक्के कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर (AIDC) लादण्यात आला आहे. मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क बुलियनच्या बरोबरीने आणण्याच्या उद्देशाने AIDC 10 टक्के मूळ उत्पादन शुल्काव्यतिरिक्त लागू करण्यात आले आहे.

22 जानेवारीपासून लागू 

सोने किंवा चांदीचे फायडिंग्ज म्हणजे हूक, क्लॅम्प्स, पिन किंवा स्क्रू बॅकसारख्या छोट्या उत्पादनांचा वापर सोन्या चांदीच्या दागिन्यांमध्ये केला जातो, त्यातून एक मोठ्या दागिण्याची निर्मिती केली जाते. हे अतिरिक्त शुल्क 22 जानेवारीपासून लागू झाले आहे. 2021-22 च्या अर्थसंकल्पात, सरकारने कृषी पायाभूत वित्तपुरवठा करण्यासाठी काही उत्पादनांवर AIDC उपकर लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

2023 च्या अर्थसंकल्पात कोणते बदल करण्यात आले?

2023 च्या अर्थसंकल्पात, सरकारने सोने आणि प्लॅटिनमच्या बरोबरीने चांदीच्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवले ​​होते. चांदीवरील मूलभूत सीमाशुल्क 7.5 टक्क्यांवरून 10 टक्के आणि आयातीवर कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर (AIDC) 2.5 टक्क्यांवरून 5 टक्के आणि चांदीच्या दोरीवर 10 टक्के मूलभूत आयात शुल्क आणि 4.35 टक्के AIDC करण्यात आले. मौल्यवान धातूंपासून बनवलेल्या वस्तूंवरील आयात शुल्क 22 टक्क्यांवरून 25 टक्के करण्यात आले. सोन्यावरील आयात शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सोने-चांदीचा आजचा दर काय? (Gold Silver Price)

आज 23 जानेवारीला, मंगळवारी सोन्याचा दर कायम असून (Gold Rate Today) त्यात कोणताही बदल झालेना नाही. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा दर स्थिर आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 57,800 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 47,290 रुपये प्रतितोळा आहे. तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,050 रुपये प्रतितोळा आहे. याशिवाय, आज चांदीचा दरही स्थिर आहे. आज चांदी 75,500 रुपये प्रति किलो आहे.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्राचा म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅपPune Porsche Car Accident Accused Rap Song :जामीन मिळाल्याचा घमंड,  दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचा रॅपCM Eknath Shinde Sambhajinagar : चारा, पाणी कमी पडून देणार नाही संभाजीनगरमधून शिंदेंचा शब्दShrikant Shinde on Dombivali Blast : डोंबिवली MIDC मध्ये स्फोट, श्रीकांत शिंदे घटनास्थळी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्राचा म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
Embed widget