एक्स्प्लोर

जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क गुजरातमध्ये, अदानी समुहाचा पुढाकार; 2 कोटींहून अधिक घरांना देणार वीज 

अदानी समूह (Adani Group) गुजरातमधील (Gujrat) वाळवंट परिसरात जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क (Green energy park) बनवत आहे.

Adani Group : अदानी समूह (Adani Group) गुजरातमधील (Gujrat) वाळवंट परिसरात जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क (Green energy park) बनवत आहे.  हे ग्रीन एनर्जी पार्क गुजरातच्या कच्छच्या रणमध्ये होत आहे. 726 चौरस किमीमध्ये हा प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 2 कोटींहून अधिक घरांना वीज देण्यात येणार आहे. खुद्द गौतम अदानी (Gautam adani) यांनी त्यांच्या ट्वीटरवर ग्रीन एनर्जी पार्कमध्ये सुरु असलेल्या कामाची छायाचित्रे शेअर केली आहेत. अदानी समूहाच्या या प्रकल्पामुळं भारताची हरित ऊर्जेची क्षमता वाढणार आहे. याशिवाय COP मध्ये केलेल्या हवामान वचनांची पूर्तता करण्यातही मदत होईल.

अदानी समूह गुजरातमधील कच्छच्या रणमध्ये जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क बनवत आहे. हे उद्यान 2 कोटींहून अधिक घरांना वीज देण्यासाठी 30 GW वीज तयार करणार आहे. यामुळं अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स शेअर बाजारात सातत्याने वेगाने व्यवहार करत आहेत.

काय म्हणाले गौतम अदानी

आम्ही जगातील सर्वात मोठे हरित ऊर्जा उद्यान उभारत असल्याचे उद्योगपती गौतम अदानी म्हणाले. भारताच्या अक्षय ऊर्जेतील प्रभावी प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आम्हाला अभिमान आहे. कच्छच्या वाळवंटात 726 चौरस किमीवर पसरलेला हा प्रकल्प अवकाशातूनही दिसतो. 2 कोटींहून अधिक घरांना वीज देण्यासाठी आम्ही 30 GW निर्माण करणार असल्याची माहिती गौतम अदानी यांनी दिली. दरम्यान, अदानी समूहाच्या या प्रकल्पामुळं भारताची हरित ऊर्जेची क्षमता वाढणार आहे.

दानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये वाढ

2030 पर्यंत, भारत आपल्या अर्थव्यवस्थेची कार्बन तीव्रता 45 टक्क्यांपेक्षा जास्त कमी करेल. तसेच 2070 पर्यंत भारत ‘नेट झिरो’चे लक्ष्य गाठेल. अदानी ग्रीन एनर्जी सौर, पवन आणि संकरित अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करत आहे. सध्या कंपनीकडे 8.4 GW एवढी अक्षय उर्जा क्षमता आहे. ही देशातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी आहे. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 5.70 टक्क्यांच्या घसरणीसह 1533.00 रुपयांवर व्यवहार करत आहेत. त्याच वेळी, संपूर्ण ट्रेडिंग आठवड्यात, अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये 15-20 टक्क्यांची वरची सर्किट दिसून आली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वी अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 2,185.30 रुपयांवर होता पण 28 फेब्रुवारीला तो 439.35 रुपयांवर आला. मात्र, त्यानंतर त्याची किंमत जवळपास तीन पटीने वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Adani Group : उत्तराखंडच्या कोसळलेल्या बोगद्याच्या कामात अदानी समूह भागिदार नाही, दुरूनही कोणताच संबंध नाही; अदानी समूहाचे स्पष्टीकरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget