(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'या' योजनांमध्ये गुंतवणूक करा, वृद्धापकाळात आरामदायी जीवन जगा
आपण जर चांगल्या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर, चांगला फायदा मिळू शकतो. वृद्धापकाळात अशा योजना खूप कामी येतात.
Pension scheme : आपण जर चांगल्या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर, चांगला फायदा मिळू शकतो. वृद्धापकाळात अशा योजना खूप कामी येतात. प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना ही देखील वृद्धावस्थेत चांगला आधार बनू शकते. 18 ते 50 वर्षे वयोगटातील लोक या योजनेत गुंतवणूक करु शकतात. यासाठी तुम्हाला वार्षिक 436 रुपयांचा प्रीमियम भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे 1 जून ते 31 मे दरम्यान प्रीमियम जमा करायचा आहे. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमचा विमा नूतनीकरण केला जातो.
वृद्धापकाळात पेन्शनच्या रुपात चांगला परतावा
प्रत्येकाचे तारुण्य दिवसेंदिवस कमी होत आहे. पण सर्वात मोठी समस्या वृद्धापकाळात येते. म्हातारपणात उत्पन्नाचे साधन नसेल तर जीवनाचे ओझे होऊन जाते. औषधांसाठीही इतरांकडून पैसे मागावे लागतात. पण, प्रत्येकाच्या बाबतीत असे घडत नाही. जे लोक तारुण्यात सावध होतात आणि वेळेत पेन्शन योजनेत काहीतरी गुंतवतात, त्यांचे म्हातारपण सुखकर होते. कारण, त्यांना दर महिन्याला पेन्शनच्या रुपात एक विशीष्ट रक्कम मिळते. म्हणूनच, आज आम्ही अशा काही सरकारी योजनांबद्दल माहिती सांगणार आहोत, की ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला वृद्धापकाळात पेन्शनच्या रुपात चांगला परतावा मिळेल.
वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारच्या योजना
वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकार सध्या अनेक सरकारी योजना राबवत आहे. या योजनांमध्ये खूप कमी प्रीमियम भरुन, तुम्ही मासिक पेन्शनसाठी पात्र होऊ शकता. विशेष म्हणजे शासनाच्या या योजनांमध्ये प्रत्येक वर्गाची काळजी घेण्यात आली आहे. जर तुम्ही आता यामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला वृद्धापकाळात पेन्शन म्हणून दर महिन्याला चांगली रक्कम मिळेल.
अटल पेन्शन योजना
अटल पेन्शन योजना सध्या केंद्रातील मोदी सरकार चालवत आहे. 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. जर गुंतवणूकदाराचे वय 60 वर्षे झाले तर या पेन्शन योजनेअंतर्गत मासिक 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन दिली जाईल. विशेष बाब म्हणजे अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किमान मासिक प्रीमियम रुपये 210 आणि कमाल मासिक प्रीमियम 1,454 रुपये जमा करावा लागणार आहे.
प्रधान मंत्री वय वंदना योजना
केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री वय वंदना योजना देखील चालवली जात आहे. ही एक उत्कृष्ट योजना आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिकही पेन्शनसाठी पर्याय निवडू शकतात. यामध्ये इतर पेन्शन योजनांच्या तुलनेत चांगले व्याजदर उपलब्ध आहेत. या योजनेअंतर्गत, तुम्ही वार्षिक पर्याय निवडल्यास, तुम्हाला 10 वर्षांसाठी 8.3 टक्के दराने व्याज मिळेल. विशेष बाब म्हणजे यामध्ये गुंतवलेली रक्कम 7.5 लाख रुपयांवरुन 15 लाख रुपये करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री कर्मयोगी मानधन योजना
ही योजना व्यापारी, दुकानदार आणि व्यापारी यांच्यासाठी आहे. विशेष म्हणजे जे व्यापारी किंवा दुकानदार जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत आहेत आणि त्यांची उलाढाल 1.5 कोटी रुपयांपर्यंत आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. 18 ते 40 वयोगटातील लोक प्रधानमंत्री कर्मयोगी मानधन योजनेचा लाभ घेऊ शकतात. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळेल. मात्र, यासाठी तुम्हाला 55 ते 200 रुपये प्रीमियम म्हणून जमा करावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या: