एक्स्प्लोर

कांद्याचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारचा प्लॅन, सणासुदीत कमी दरात मिळणार कांदा, जाणून घ्या सविस्तर माहिती 

सध्या कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी वाढ होताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात कांद्याचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारनं प्लॅन केला आहे.

Kanda Express: सध्या कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी वाढ होताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात कांद्याचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारनं प्लॅन केला आहे. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेडने खरेदी केलेला सुमारे 840 मेट्रिक टन कांदा बुधवारी दिल्लीत पोहोचला आहे. याआधीही भारतीय रेल्वेच्या विशेष कांदा एक्स्प्रेसने (Kanda Express) 1600 मेट्रिक टन कांदा दिल्ली-एनसीआरला पाठवला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये रेल्वेने कांदा पाठवण्याची ही दुसरी वेळ आहे. 

35 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री केली जाणार

केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, बाजारपेठेतील एकूण उपलब्धता वाढवण्यासाठी, बहुतांश कांदा आझादपूर मंडईत विक्रीसाठी पाठवला जाईल. कांद्याचा काही भाग किरकोळ विक्रीसाठी 35 रुपये प्रतिकिलो या दराने ठेवला जाईल. विविध प्रदेशात कांदा वेळेवर, विश्वासार्ह आणि किफायतशीर पोहोचवण्यासाठी प्रथमच रेल्वेद्वारे कांद्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येत आहे. 

नाशिकहून चेन्नईला रेल्वेद्वारे पाठवला कांदा

नाफेडने यापूर्वी नाशिकहून 840 मेट्रिक टन कांदा रेल्वेद्वारे पाठवला होता, जो 26 ऑक्टोबर रोजी चेन्नईला पोहोचला होता. नाशिक ते गुवाहाटी असा आणखी एक रेल्वे रेक बुधवारी सकाळी 840 मेट्रिक टन कांद्यासह नाशिकहून निघाला. किंमत स्थिरीकरणासाठी सरकारने यावर्षी 4.7 लाख टन रब्बी कांदा खरेदी केला होता. 5 सप्टेंबरपासून देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये किरकोळ विक्रीद्वारे कांदा 35 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध झाला आहे. आतापर्यंत नाशिकसह अन्य स्रोत केंद्रातून 1.40 लाख टनांहून अधिक कांदा बफरमधील ग्राहक केंद्रांवर पाठवण्यात आला आहे.

किती राज्यात पोहोचली कांदा एक्सप्रेस ?

आतापर्यंत, NCCF ने 22 राज्यांमधील 104  ठिकाणी कांदा पोहोच केला आहे. तर NAFED ने 16 राज्यांमधील 52 ठिकाणी कांदा पोहोच केला आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, किरकोळ ग्राहकांना 35 रुपये प्रति किलो दराने कांदा उपलब्ध करून देण्यासाठी सफाल, केंद्रीय भंडार आणि रिलायन्स रिटेलसोबत भागीदारी करण्यात आली आहे. याशिवाय 86,500 मेट्रिक टन कांद्याचे किरकोळ वितरणासाठी 9 राज्य सरकारे आणि सहकारी संस्थांना वाटप करण्यात आले आहे.

या' राज्यांना मिलाला दिलासा

कांद्याचा बंदोबस्त सुरु झाल्यापासून आजपर्यंत, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्ली या प्रमुख राज्यांमध्ये कांद्याच्या किरकोळ किमती मोठ्या प्रमाणावर स्थिर झाल्या आहेत. सरकारी संस्थांचा असा विश्वास आहे की ऑक्टोबरमध्ये कांद्याच्या अखिल भारतीय सरासरी किरकोळ किमती मोठ्या प्रमाणात स्थिर होत्या. आता रेल्वे मार्गाने गुवाहाटीला पोहोचणाऱ्या कांद्याचा माल ईशान्येकडील राज्यांमध्ये कांद्याची उपलब्धता वाढवेल.

महत्वाच्या बातम्या:

कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा प्लॅन, महाराष्ट्रातून 'कांदा एक्सप्रेस' दिल्लीला रवाना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha Superfast : विधानसभा सुपरफास्ट : 1 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaJob Majha :  कोल इंडिया लिमिटेड : 1 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 1 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaAbdul Sattar vs Raosaheb Danve : नाव नं घेता सत्तारांचा दानवेंना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Embed widget