एक्स्प्लोर

कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा प्लॅन, महाराष्ट्रातून 'कांदा एक्सप्रेस' दिल्लीला रवाना

कांद्याचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारनं नवीन प्लॅन केला आहे. कांदा एक्स्प्रेस' (Onion Express) ही विशेष ट्रेन महाराष्ट्रातील लासलगाव रेल्वे स्थानकावरुन

Onion Express : सणांच्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या वाढत्या किमतींवर (Onion Price) नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार प्रथमच बफर स्टॉकमधून 1600 टन कांदा महाराष्ट्रातून (Maharashtra) रेल्वेमार्गे दिल्लीपर्यंत नेणार आहे. कांद्यासाठी रेल्वेचा वापर करण्याचा हा पहिलाच उपक्रम असणार आहे. ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 'कांदा एक्स्प्रेस' (Onion Express) ही विशेष ट्रेन महाराष्ट्रातील लासलगाव रेल्वे स्थानकावरुन निघून 20 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील किशनगंज रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

कांद्याचे भाव स्थिर राहणार 

सरकारला आशा आहे की, या पुरवठ्यामुळं दिल्लीमध्ये किमती स्थिर राहण्यास मदत होईल. दिल्लीत बफर स्टॉकमधील कांदा सध्या 35 रुपये प्रति किलो या अनुदानित दराने विकला जात आहे. विविध शहरांमध्ये कांद्याचे किरकोळ भाव 75 रुपये किलोवर पोहोचले आहेत. लखनौ, वाराणसी आसाम, नागालँड मणिपूरसह उत्तर-पूर्व राज्यांमध्ये अशीच व्यवस्था केली जाईल. तोटा कमी करण्यासाठी 'सीलबंद कंटेनर' वाहतुकीसाठी लॉजिस्टिक्स कंपनी कॉनकॉर्डशीही सरकार चर्चा करत आहे. घाऊक भाव कमी करण्यासाठी सध्याच्या बाजारभावानुसार कांद्याचा लिलाव करण्यात येणार आहे.

रेल्वे वाहतुकीमुळं कांद्याचा खर्च कमी होणार 

रेल्वे वाहतुकीमुळं कांद्याचा खर्च कमी होणार असल्याची माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. नाशिक ते दिल्ली रेल्वेने एका ट्रेनच्या (56 ट्रकच्या समतुल्य) वाहतुकीसाठी 70.20 लाख रुपये खर्च येतो, तर रस्त्याने 84 लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे प्रति ट्रेन 13.80 लाख रुपयांची बचत होते.

सरकार सवलतीच्या दरात कांदा विकणार

5 सप्टेंबरपासून, सरकार मोबाईल व्हॅन, नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) आणि नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) दुकाने, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, मदर डेअरी यासह विविध माध्यमांद्वारे स्टोअरमध्ये साठवलेल्या कांद्यावर अनुदान देण्यास सुरुवात करेल. किरकोळ किमती कमी करण्यासाठी आपली कारवाई वाढवत दिवाळीपूर्वी 'मोबाइल व्हॅन'ची संख्या 600 वरुन 1000 केली जाईल.बफर स्टॉकमधील 4.7 लाख टन कांद्यापैकी 91,960 टन कांदा एनसीसीएफ आणि नाफेडला वाटप करण्यात आला आहे. तर 86,000 टन कांदा गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि मणिपूरसह विविध राज्यांमध्ये पाठवण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे आणि महाराष्ट्रातून ताज्या पिकाची अपेक्षित आवक असल्यामुळं सरकार किमती स्थिरावण्याबाबत आशावादी आहे. दुकानातून कांद्याची सरासरी खरेदी किंमत 28 रुपये प्रति किलो आहे.

महत्वाच्या बातम्या:

शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांना फटका! कांदा टोमॅटोसह भाजीपाल्यांच्या दरात वाढ, कोणत्या भाजीला किती दर? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
Sangola Vidhansabha : लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : मविआच्या जागावाटपाआधीच ठाकरेंचे पत्ते ओपनAaditya Thackeray On Ashish Shelar :आशिष शेलारांना मेंटल कौन्सिलिंगची गरज,ठाकरे काय बोलले?Zero Hour : मुख्यमंत्रिपदावर शरद पवारांचं सूचक विधान, पवारांकडून अप्रत्यक्ष घोषणा?Zero Hour Guest Center : मविआचा 260 जागांचा तिढा सुटला, 20 ते 25 जागांचा तिढा कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 
Sangola Vidhansabha : लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
अजूनही मतदार नोंदणी केलीच नाही? मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत शेवटची संधी!
शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक, 15 मतदारसंघातील उमेदवार ठरले; एबी फॉर्मही दिले?
शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक, 15 मतदारसंघातील उमेदवार ठरले; एबी फॉर्मही दिले?
Vasundhara Oswal : ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
अजित पवारांनी अमोल मिटकरींना आवरावं, नाहीतर बारामतीसह इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही, भाजप युवा मोर्चाचा इशारा
अजित पवारांनी अमोल मिटकरींना आवरावं, नाहीतर बारामतीसह इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही, भाजप युवा मोर्चाचा इशारा
Multiple Bomb Threats to Indian Flights : भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
Embed widget