![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
आता मित्र-नातेवाईकांकडून बिनधास्त उधारी मागा..., Google Pay आणि पेटीएमचं 'Split फीचर'
यापुढे पेटीएम (Paytm) आणि गुगल पे (Google Pay) युजर्स त्यांचे बिल विभाजित अर्थात स्ल्पिट करू शकतात आणि नंतर बिलाचा प्रत्येक भाग स्वतंत्रपणे देऊ शकतात.
![आता मित्र-नातेवाईकांकडून बिनधास्त उधारी मागा..., Google Pay आणि पेटीएमचं 'Split फीचर' Google Pay and Paytm s Split Feature Now ask your friends and relatives for a free loan आता मित्र-नातेवाईकांकडून बिनधास्त उधारी मागा..., Google Pay आणि पेटीएमचं 'Split फीचर'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/18/c2bb7d0ae8af97da4b70f9e3b2d3fd32_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : डिजिटल पेमेंटचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. त्यातही गुगल पे आणि पेटीएमसारख्या अॅप्सद्वारे व्यवहार वाढत आहेत. या दोन्ही पेमेंट अॅप कंपन्या त्यांच्या वापरकर्त्यांसाठी फीचर्समध्ये सातत्याने सुधारणा करत आहेत. यातच आता एक नवीन फीचर जोडण्यात आले आहे. पेटीएम आणि गुगल पे युजर्स त्यांचे बिल विभाजित अर्थात स्ल्पिट करू शकतात आणि नंतर बिलाचा प्रत्येक भाग स्वतंत्रपणे देऊ शकतात. यामध्ये एक ऑटो पर्याय देखील असेल ज्यामध्ये संपूर्ण रक्कम कॉन्टॅक्ट मध्ये समान रीतीने विभागली जाईल. खाली Google Pay आणि Paytm वर बिल विभाजित करण्यासाठी स्टेप बाय स्टेप पर्याय आहेत.
गुगल पेचं नवं फीचर कसं वापराल?
Google Pay उघडा आणि न्यू पेमेंट पर्यायावर क्लिक करा.
एक नवीन स्क्रीन उघडेल. या स्क्रीनवर 'ट्रान्सफर मनी' टॅबखाली 'न्यू ग्रुप' पर्याय दिसेल.
'न्यू ग्रुप' ऑप्शनवर क्लिक केल्यावर, एक नवीन स्क्रीन दिसेल ज्यावर सर्व कॉन्टॅक्टनंबर आणि नावे दिसतील.
या स्क्रीनवर ज्याच्यासोबत तुम्हाला बिल शेअर करायचे आहे, तुम्ही त्या कॉन्टॅक्ट पर्सनला ग्रुपमध्ये अॅड करू शकता.
त्या पुढील स्क्रीनवर तुम्हाला गटाचे (ग्रुपचे) नाव देण्यास सांगितले जाईल.
यानंतर ग्रुप तयार झाल्यावर, वापरकर्त्यांना बॉटमध्ये ‘Split an Expense’ बटण दिसेल.
जेव्हा तुम्ही रक्कम स्प्लिट करायची असेल, तेव्हा ती एकतर ग्रुपमधील सदस्यांमध्ये समान रीतीने विभागली जाईल किंवा रक्कम कोणत्या कॉन्टॅक्ट पर्सनने भरायची आहे त्यानुसार तुम्ही सेट करू शकता.
या ठिकाणी जर तुम्हाला ग्रुपमधील कोणत्याही व्यक्तीने बिल भरावे असे वाटत नसेल तर तुम्ही ते अनचेक करू शकता.
पॅरामीटर सेट केल्यावर 'Send Request' वर क्लिक केल्यानंतर पेमेंट रिक्वेस्ट पाठवली जाईल.
ग्रुप सदस्यांनी ग्रुपच्या मुख्य स्क्रीनवर पैसे दिले की नाही याचा मागोवा घेऊ शकतील.
पेटीएम साठी हे पर्याय
पेटीएम अॅप उघडल्यानंतर, वापरकर्त्यांना उजवीकडे स्वाइप करावे लागेल आणि कंवर्जेशंस पेज जावं लागेल.
अॅपच्या बॉटम पाशी 'स्प्लिट बिल' हा पर्याय दिसेल.
तो क्लिप केल्यावर, एक नवीन पेज दिसेल, तिथे रक्कम स्प्लिट करण्याचा आणि कॉन्टॅक्ट परर्सन निवडण्याचा पर्याय असेल.
याच पेजवर युजर्स ऑटो स्प्लिटची निवड करू शकतात ज्यामध्ये सर्व कॉन्टॅक्ट परर्सन्समध्ये समान रक्कम विभागली जाईल.
यासोबतच वापरकर्ते मॅन्युअली प्रत्येक व्यक्तीला देय रक्कम निवडू शकतात.
आणि निवडल्यानंतर पेमेंट रिक्वेस्ट पाठवली जाईल.
ग्रुपच्या मुख्य पेजवर रकमेवर क्लिक केल्यास विभाजनाची अर्थात स्प्लिट ची माहिती मिळेल.
याशिवाय येथे तुम्ही कोणत्या कॉन्टॅक्ट पर्सनने पैसे भरले हे देखील पाहू शकाल.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)