एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅपच्या अर्जाला मंजुरी; PhonePe, Google Pay ला टक्कर!

WhatsApp: डिजिटल पेमेंट व्यवसायातील स्पर्धा आणखी तगडी होणार आहे.

WhatsApp: डिजिटल पेमेंट व्यवसायातील स्पर्धा आणखी तगडी होणार आहे. कारण NPCI ने व्हॉट्सअॅपच्या पेमेंट सेवेअंतर्गत वापरकर्त्यांची मर्यादा वाढवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर आतापर्यंत 20 दशलक्ष वापरकर्त्यांची मर्यादा लागू करण्यात आली होती, ती आता 4 कोटींपर्यंत वाढवता येणार आहे. व्हॉट्सअॅपने एनसीपीआयकडे त्यांच्या पेमेंट सेवेतील वापरकर्त्यांची मर्यादा वाढवण्यासाठी अर्ज केला होता, जो आतापर्यंत पुनरावलोकनाखाली होता.

सूत्रांनी दिलेल्या हवाल्यानुसार, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) देशाची रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम चालवते. NPCI ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये व्हॉट्सअॅपला पेमेंट सेवा सुरू करण्यास मान्यता दिली होती. परंतु, त्याच वेळी त्यावर 20 दशलक्ष वापरकर्त्यांची मर्यादा घातली होती. म्हणजे व्हॉट्सअॅप आपली पेमेंट सेवा फक्त 20 दशलक्ष लोकांनाच देऊ शकत होती.

व्हॉट्सअॅपमुळे फारसा फरक नाही

मेटाचा मालकी हक्क असलेल्या व्हॉट्सअॅपला पेमेंट सेवेची मान्यता मिळाल्यावर डिजिटल पेमेंटच्या विश्वात मोठी उलथापालथ होईल अशी अपेक्षा होती. कारण व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या देशभरात मोठ्या प्रमाणात आहे. पण हा अंदाज फोल ठरला आणि व्हॉट्सअॅपची पेमेंट सेवा म्हणावी तितक्या प्रमाणात यशस्वी झाली नाही.

पेमेंट सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय

व्हॉट्सअॅपने आपल्या पेमेंट सेवेचा विस्तार करण्यावर भर देण्याचे ठरवले आहे आणि यासाठीच व्हॉट्सअपला यूजर ग्रुप वाढवायचा आहे. परिणामी आता व्हॉट्सअॅप पेमेंटची मर्यादा वाढवण्यास मंजुरी मिळाल्याने गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि जिओ पे, मोबिक्विक यांना देशात आणखी एक तगडा स्पर्धक मिळणार आहे. याचे कारण म्हणजे लोकांना पेमेंटसाठी वेगळे अॅप इन्स्टॉल करावे लागणार नाही.

व्हॉट्सअॅपचा वापरकर्ता मोठा वर्ग

भारतभर WhatsApp मेसेजिंग सेवेचे 400 दशलक्ष वापरकर्ते आहेत. व्हॉट्सअॅप पेमेंट सेवेमधून वापरकर्ता मर्यादा एकाच वेळी काढून टाकल्याने NPCI च्या सिस्टमवर अचानक दबाव येऊ शकतो, हे लक्षात घेऊन NPCI टप्प्याटप्प्याने WhatsApp च्या पेमेंट सेवेची वापरकर्ता मर्यादा हळूहळू वाढवण्याच्या धोरणावर काम करत आहे. मात्र, यावर व्हॉट्सअॅप आणि एनपीसीआयकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Embed widget