Gold Demand : गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सोन्याच्या मागणीत 47 टक्क्यांनी वाढ
कोरोनाकाळात गेल्यावर्षीच्या जुलै-सप्टेंबर महिन्यात देशातील सोन्याची (Gold Demand) मागणी 94.6 टन इतकी होती, त्या तुलनेत यंदा ती 139.1 टनांवर गेली आहे.
मुंबई : गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सोन्याच्या (Gold) मागणीत 47 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती (World Gold Council) जागतिक सुवर्ण परिषदेनं दिली आहे. त्यातच दसरा झाला आता दिवाळीसारखे सणासुदीचे दिवस असल्याने सोन्याची मागणी वाढणार असल्याचं WGC चा अंदाज आहे
कोरोनाकाळात गेल्यावर्षीच्या जुलै-सप्टेंबर महिन्यात देशातील सोन्याची मागणी 94.6 टन इतकी होती, त्या तुलनेत यंदा ती 139.1 टनांवर गेली आहे. (59,330 कोटी रुपये) सोन्याच्या दागिन्यांची मागणी सुद्धा 58 टक्क्यांनी वाढली आहे म्हणजे दागिन्यांसाठी सोने आयात 60 टनांवरुन 96.2 टनांवर गेली आहे .
WGC च्या q3 गोल्ड डिमांड ट्रेंड्स 2021 च्या रिपोर्टनुसार सप्टेंबर तिमाहीच्या दरम्यान सोन्याची मागणी 37% वाढली असून 59,330 कोटी रुपये झाली असून जी गेल्यावर्षी 43, 160 कोटी रुपये होती. WGC चे रीजनल CEO इंडिया सोमसुंदर म्हणाले, सोन्याच्या मागणीवर बेस इफेक्टबरोबरटच पॉझिटिव्ह ट्रेंड आणि कंज्युमर सेंटीमेंटचा परिणाम दिसत आहे.
सोमसुंदर पुढे म्हणाले, सोन्याच्या मागणीत वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे लसीकरण. लसीकरणामुळे कोरोनाच्या संख्येत झाली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. तरी चौथ्या तिमाहीत सोन्याची आयात जास्त होणार नाही. कारण सोनार सणासुदीसाठी सोन्याचा स्टॉक अगोदरच तयार करतात. कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत असून सर्व पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे सोन्याची मागणी देखील पूर्वीप्रमाणे आहे. सोन्याच्या मागणीत अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे सण आणि लग्नसराई.
डिजीटल गोल्डच्या मागणीत वाढ
डिजीटल गोल्डच्या मागणीत देखील अनेक पटीने वाढ झाली आहे. अनेक ज्वेलरीच्या कंपन्यांनी विक्री वाढवण्यासाठी डिजीटल गोल्ड आणि यूपीआय शी करार केला आहे. कमोडिटी प्राईस आणि लॉजिस्टिक कॉस्टमध्ये अचानक आलेल्या वाढीमुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.
मूल्याच्या दृष्टीने सोन्यातील गुंतवणुकीवर नजर टाकली तर जुलै-सप्टेंबर या तिमाहीत 15,410 कोटी रुपयांवरून 19 टक्क्यांनी म्हणजे 18,300 कोटीवर पोहचले आहे. रिपोर्टनुसार जुलै-सप्टेंबर या तिमाहीमध्ये सोने चांदीच्या 187 टक्के वाढली असून 255.6 टनावर पोहचली आहे. जी गेल्यावर्षी 89 टक्के होती.
Viral Video of Bike Cycle: पट्रोलच्या वाढत्या किंमतीला कंटाळून एका व्यक्तीने लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हायरल व्हिडिओ