एक्स्प्लोर

Sovereign Gold Bond : सोनं खरेदीची सुवर्णसंधी... दिवाळीपूर्वी सरकार विकतंय स्वस्त सोनं, पाहा किती किंमत

Sovereign Gold Bond : आजपासून रिझर्व्ह बँकेच्या सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेच्या सातव्या टप्प्याला सुरुवात होत आहे. ही योजना आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच, पाच दिवसांसाठीच असणार आहे.

Sovereign Gold Bond : सध्या लगीनसराई आणि सणासुदीचा काळ सुरु आहे. त्यामुळे या काळात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. काळ बदलतोय आणि त्यानुसार सोनं खरेदी करण्याची पद्धतही बदलत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी डिजिटल सोने खरेदी करुन तुम्ही सहज गुंतवणूक करु शकता. केंद्र सरकारनं ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. प्रत्यक्ष सोने खरेदीऐवजी आता डिजिटल सोनं खरेदी करुन गुंतवणूक करता येणार आहे. आजपासून रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) सॉव्हरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) योजनेच्या सातव्या टप्प्याला सुरुवात होत आहे. ही योजना पाच दिवसांसाठीच असणार आहे. या काळात गुंतवणूकदारांना बाजारपेठेपेक्षा कमी दरानं डिजिटल सोनं खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

आजपासून रिझर्व्ह बँकेच्या सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेच्या सातव्या टप्प्याला सुरुवात होत आहे. ही योजना आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच, पाच दिवसांसाठीच असणार आहे. या काळात गुंतवणूकदारांना बाजारपेठेपेक्षा कमी दराने सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हे बाँड खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास ग्राहकांना आणखी सूटदेखील मिळणार आहे. सोनं खरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. या योजनेत एका आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 4 किलो तर कमीत कमी 1 ग्रॅम गोल्ड बाँडची खरेदी करू शकते. त्याशिवाय ट्रस्ट किंवा यासारख्या संस्था जास्तीत जास्त 20 किलो बाँडची खरेदी करू शकतात. 

2 नोव्हेंबर रोजी जारी होणार बॉन्ड 

या टप्प्यात ग्राहक 25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूक करु शकतात आणि सॉव्हरिन गोल्ड बाँड 2 नोव्हेंबरपासून जारी करण्यात येणार आहेत. अर्थ मंत्रालयानं (Finance Ministry) एका वक्तव्यामध्ये म्हटलं होतं की, सॉव्हरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) योजनेचा हा सातवा टप्पा आहे. 

पाहा व्हिडीओ : स्वस्तात सोनं खरेदीची सुवर्णसंधी

किंमत काय असेल? 

अर्थ मंत्रालयानं शनिवारी म्हटलं की, सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना 2021-22 च्या पुढील हप्त्यासाठी इश्यू किंमत 4,765 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे.

कुठे खरेदी कराल? 

जर तुम्हाला या योजनेत बाँड खरेदी करायचे असतील तर गुंतवणूकदार हे स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्टऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज (Stock Exchanges), NSE आणि BSE च्या माध्यमातून खरेदी करु शकता. दरम्यान, लहान वित्त बँक आणि पेमेंट बँकेत याची विक्री होत नाही. 

किती रक्कमेची गुंतवणूक शक्य? 

जर आपण यात जास्तीत जास्त गुंतवणूकीबद्दल बोललो, तर आपण 4 किलो सोन्याचे रोखे खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त ट्रस्ट किंवा एखाद्या संस्थेबाबत बोलायचं झालं तर ते 20 किग्रॅपर्यंत बाँड खरेदी करु शकतात. बाँडची किंमत इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लि. एसोसिएशन लि. (IBJA) द्वारे देण्यात आलेल्या 999 शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी क्लोजिंग प्राइज आधारावर निश्चित केली आहे. 

सॉव्हरिन गोल्ड बाँडचे फायदे : 

  • या योजनेत गुतवणूकदारांना वार्षिक 2.5 टक्के दरानं व्याज मिळतं. 
  • या योजनेत कॅपिटल गेन टॅक्समध्ये सूट मिळते. 
  • या योजनेंतर्गत सोने खरेदीसाठी जीएसटी आणि मेकिंग चार्ज द्यावा लागत नाही.
  • या व्यतिरिक्त, आपण हे कोलॅटरल म्हणून देखील वापरू शकतो. 
  • आपण स्टॉक एक्सचेंजद्वारे ट्रेड करू शकता.
  • याव्यतिरिक्त या बाँड्सच्या सिक्योरिटीबाबतही गुंतवणूकदारांना टेन्शन घेण्याची गरज नाही. 

सॉव्हरिन गोल्ड बाँड म्हणजे काय? 

सॉव्हरिन गोल्ड बाँड हा एक सरकारी बाँड असतो. ही योजना आरबीआयच्या वतीनं जारी केली जाते. सरकानं ही योजना 2015 मध्ये सुरु केली होती. यामध्ये सोन्याच्या वजनाच्या रुपात खरेदी करु शकतो. जर हे बाँड 5 ग्रॅमचे असतील तर याची किंमत 5 ग्रॅम सोन्याच्या बरोबरीनं असते. 

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget