Vinod Adani Information : गौतम अदाणी यांचे बंधू विनोद अदाणी यांच्याबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?
गौतम अदाणी यांचा मोठा भाऊ हा अब्जो रुपयांचे मालक आहेत. ते जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानी आहेत.
मुंबई : अब्जाधीश गौतम अदाणी (Gautam Adani) हे जगभरात प्रसिद्ध आहेत. जगातल्या मोजक्याच श्रीमंत लोकांमध्ये त्यांचा समावेश आहे. भारतात असे एखादे क्षेत्र अभावेच सापडेल ज्या क्षेत्रात त्यांनी गुंतवणूक केलेली नाही. मात्र गौतम अदाणी यांच्या मोठ्या भावाबद्दल मात्र अनेकांना माहिती नाही. फारसे चर्चेत नसलेले गौतम अदाणी यांचे मोठे बंधू (Gautam Adani Brother) अब्जो रुपयांचे मालक आहेत.विशेष म्हणजे जगातील 100 श्रीमंत लोकांमध्ये त्यांचा समावेश होतो.
जगातील श्रीमंतांच्या यादीत नाव
गौतम अदाणी यांच्या मोठ्या भावाचे नाव विनोद अदाणी असे आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार विनोद अदाणी (Vinod Adani) हे जगातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानी आहेत.
लाखो कोटी रुपयांची संपत्ती
मिळालेल्या माहितीनुसार विनोद अदाणी (Gautam Adani Brother) यांची संपत्ती 24.2 अब्ज डॉलर आहे. भारतीय चलनात सांगायचे झाल्यास त्यांची संपत्ती ही 2 लाख 1 हजार 912 कोटी रुपये आहे. विनोद अदाणी यांच्या फर्मने 2022 साली स्वीत्झर्लंडमधील होलसिम्स नावाची कंपनी 10 .5 अब्ज रुपये देऊन खरेदी केली. त्यानंतर अदाणी समूह देशातील सर्वांत मोठा दुसरा सिमेंट निर्मिती करणारा समूह बनला.
अगोदर सिंगापूरला जाऊन ट्रेडिंग
विनोद अदाणी यांनी आपल्या कारकिर्दीला 1976 साली सुरुवात केली. सुरुवातील त्यांनी यंत्रमागानिर्मिती क्षेत्रात काम केले. पुढे त्यांनी आंतरराष्ट्रीय बाराजात गुंतवणूक करण्यासाठी सिंगापूरमध्ये कार्यालय चालू केले. सिंगापूरला जाऊन त्यांनी ट्रेडिंग केली. त्यानंतर ते 1994 साली दुबाईत स्थलांतरित झाले.
हे ही वाचा :
भारताच्या संरक्षण निर्यातीचा विक्रम, इतिहासात प्रथमच पार केला 21 हजार कोटींचा टप्पा