Layoff : Disney कंपनीला आर्थिक मंदीचा मोठा फटका, सात हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ
Layoffs : Disney कंपनीनं देखील कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 7 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे.
Disney layoff 7000 Employees : जागतिक आर्थिक मंदीचा मोठा फटका कंपन्यांना बसत आहे. जगभरातील अनेक कंपन्यांनी नोकरकपात (Layoff) करत आहेत. अशातच आता Disney या कंपनीनं देखील कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 7 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय Disney या कंपनीनं घेतलं आहे. कंपनीचे सीईओ बॉब इगर ( Bob Iger) यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Bob Iger : आमच्या कर्मचार्यांबद्दल आम्हाल खूप आदर आणि कौतुक : बॉब इगर
मंदीमुळं वाढलेला खर्च लक्षात घेता जगभरातील अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी नोकरकपातीचा सपाटा लावला आहे. ट्विटर, मेटा, ॲमेझॉन, गुगल या मोठ्या कंपन्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली आहे. यानंतर आता Disney या कंपनीनं देखील 7 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातील आमच्या कर्मचार्यांबद्दल आम्हाला खूप आदर आणि कौतुक असल्याचे बॉब इगर म्हणाले.
Layoff Employees : अनेक मोठ्या कंपन्यांनी केली नोकरकपात
डिसेंबर 2022 मध्ये सीईओ म्हणून पदभार स्वीकारणाऱ्या बॉब इगर यांच्यासमोर नवीन आव्हाने आहेत. मंदीचा मोठा फटका कंपनीला बसत आहे. त्यामुळं खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनीनं कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णाय घेतला आहे. इतर अनेक मोठ्या कंपन्यांनी देखील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. आर्थिक मंदीमुळं अनेक मोठ्या कंपन्या संकटात सापडल्या आहेत. गुगलने देखील मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. गुगलने जवळपास 12 हजार लोकांना कामावरून काढून टाकले होते. गुगल व्यतिरिक्त मेटा (फेसबुक आणि इंस्टाग्राम), अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, एसएपी, ओएलएक्स आणि इतर काही मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
वाचा कोणत्या कंपनीत किती कपात?
ट्विटर (Twitter) : एलन मस्क यांनी कंपनी ताब्यात घेतल्यापासून साधारण 50 टक्के कर्मचारी कपात केली आहे.
नेटफ्लिक्स (Netflix) : नेटफ्लिक्सलाही यंदा आर्थिक फटका बसलाय, कंपनीनं दोन टप्प्यात कर्मचारी कमी केले आहेत.
मेटा : फेसबुकची मूळ कंपनी मेटा कंपनी देखील मोठी कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे.
अॅमेझॉन : ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन 18 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे.
सिगेट टेक्नॉलॉजिज : हार्ड ड्राईव्ह निर्मितीतल्या महत्वाच्या कंपनीनंही 3000 कर्मचारी कपात करण्यात आली आहे.
इंटेल : 18 हजार कोटींची बचत करण्यासाठी जवळपास 20 टक्के कपातीची शक्यता आहे.
मायक्रोसॉफ्ट : अपेक्षित उत्पन्न नसल्याने मायक्रोसॉफ्टने 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: