Elon Musk: लाखाचे बारा हजार होणं म्हणतात ते हेच, X वर मोठं संकट, एलन मस्कचे पैसे बुडणं सुरुच,ट्विटर खरेदी अंगलट
Twitter: टेस्लाचा संस्थापक एलन मस्कने ट्विटर 44 अब्ज अमेरिकन डॉलर्स देऊन खरेदी केलं होतं. मस्कनं त्यानंतर त्याचं नाव एक्स केलं होतं. मस्कचा ट्विटर खरेदीचा निर्णय फसल्याचं चित्र आहे.
नवी दिल्ली : लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची (Twitter) खरेदी केल्यानंतर एलन मस्कनं (Elon Musk) त्याचं नाव एक्स (X) असं ठेवलं होतं. टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यांचे मालक असलेल्या एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केलं होतं. मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठी मोठी रक्कम मोजली होती.44 अब्ज अमेरिकन डॉलर्स देऊन ट्विटर खरेदीची डील एलन मस्क यांनी केली होती. मात्र, एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचं बाजारमूल्य 75 टक्क्यांनी घटलं आहे. यामुळं फक्त एलन मस्कचं नाही इतर गुंतवणूकदार देखील चिंतेत असल्याची माहिती आहे. बाजारमूल्य घटत राहिलं तर लवकरच एक्स प्लॅटफॉर्मबाबत एलन मस्कला मोठा निर्णय घ्यावा लागेल.
34 अब्ज डॉलर्स बुडाले
फिडेलिटी ब्लू चिप ग्रोथ फंड (Fidelity Blue Chip Growth Fund) यांच्या एका रिपोर्टनुसार एलन मस्कनं ट्विटर 44 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली होती. फिडेलिटीनं यामध्ये 1.96 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली होती. मात्र, जुलै 2024 च्यामध्ये फिडेलिटीच्या शेअर्सची किंमत 55 लाख डॉलर्सवर पोहोचली होती. त्या रिपोर्टनुसार एक्सचं बाजारमूल्य 9.4 अब्ज डॉलर्स राहिलं आहे. एलन मस्क जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असला तरी त्याला 34 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे. एलन मस्कसाठी हा मोठा फटका मानला जात आहे.
उत्पन्न घटलं, जाहिरातींचा महसूल घटला
एक्समध्ये ज्यांनी गुंतवणूक केली अशा गुंतवणूकदारांकडून कंपनीच्या बाजारमूल्याची माहिती दिली जाते. फिडेलिटीकडून एक्सचं बाजारमूल्य कमी करण्यात आलं आहे. फिडेलिटीनं एक्सचं बाजारमूल्य 78.7 टक्क्यांनी घटवलं आहे.जानेवारी आणि मार्चमध्ये देखील त्यांनी एक्सची मार्केट वॅल्यू घटवली होती.2023 मध्ये एक्सनं 2.5 अब्ज डॉलर्स उत्पन्न मिळवलं होतं. 2022 च्या तुलनेत उत्पन्नात 50 टक्क्यांची घट झाली आहे. एक्सच्या उत्पन्नात अॅड सेल्सचा वाटा 75 टक्के असून त्यातही घसरण होत आहे.
एक्सच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह, बंद होण्याची शंका
एक्सनं खर्च कमी करण्यासाठी सॅन फ्रान्सिस्कोमधील कार्यालय बंद करण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांची देखील बदली केली जात आहे. कर्मचाऱ्यांमध्ये एक्सच्या भवितव्यावर शंका आहे. फिडेलिटीशिवाय बिल एकमॅन आणि सॉन डिडी कॉम्ब एक्समधील गुंतवणूकदार आहेत. सॉनवर मानवी तस्करीसारखे गंभीर आरोप आहेत. त्यामुळं एक्सच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकांनी ट्विटर बंद होण्याची शंका व्यक्त केली आहे.
इतर बातम्या :
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट