मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट
सणासुदीच्या काळात देशातील शेतकऱ्यांना (Farmers) मोठी भेट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे 5 ऑक्टोबरला PM किसानचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana)18 वा हप्ता जारी करणार आहेत.
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana : सध्या सणासुदीच्या काळ सुरु झाला आहे. या काळात देशातील शेतकऱ्यांना (Farmers) मोठी भेट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) 18 वा हप्ता जारी करणार आहेत. त्यामुळं 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार आहेत. जाणून घेऊयात याबबतची सविस्तर माहिती.
आत्तापर्यंत 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3.25 लाख कोटी जमा
PM किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठ्या DBT योजनेपैकी एक आहे. PM किसान सन्मान अंतर्गत आत्तापर्यंत 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3.25 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील वाशिम येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करतील. मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर 18 जून 2024 रोजी 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आता 5 ऑक्टोबर 2024 ला 18 वा हप्ता देण्यात येणार आहे.
5 ऑक्टोबरला हरियाणा विधानसभेसाठी मतदान
येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग केले जाणार आहेत. त्याच दिवशी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होणार आहे.
एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठ्या थेट हस्तांतरण योजनांपैकी एक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना ही योजना सुरू केली होती. पीएम किसान योजनेंतर्गत, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये थेट हस्तांतरित केले जातात. जेणेकरून त्यांना महागड्या बियाणे आणि खतांपासून दिलासा मिळू शकेल. पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 3.25 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
ई-केवायसी आवश्यक
पीएम किसानच्या सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. OTP बेस्ट ई-केवायसी PMKisan पोर्टलवर उपलब्ध आहे. याशिवाय, बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधता येईल.
तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे कसे तपासायचे?
जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी प्रथम https://pmkisan.gov.in/ वर जा.
मुख्यपृष्ठावरील संबंधित लिंकवर क्लिक करा आणि तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
यानंतर कॅप्चा प्रविष्ट करा.
यानंतर Get Status वर क्लिक करा.
यानंतर, हप्त्याशी संबंधित स्थिती स्क्रीनवर दिसेल.
मोबाईल ॲपद्वारे शेतकरी त्यांच्या पेमेंटची स्थिती तपासू शकतात.
महत्वाच्या बातम्या: