बँकिंग ते क्रेडिट कार्ड, डिसेंबर महिन्यात महत्त्वाच्या नियमांत मोठे बदल, जाणून घेणं गरजेचं, अन्यथा बसू शकते खिशाल झळ!
डिसेंबर महिना चालू झाला आहे. या महिन्यात फायनान्ससंदर्भात अनेक नियमांत बदल होणार आहे. हे बदल जाणून न घेतल्यास तुमच्या खिशाला झळ बसू शकते.
December Financial Rule Change : नोव्हेंबर महिना संपला असून आता डिसेंबर महिना चालू झाला आहे. 2024 सालाचा हा शेवटचा महिना आहे. दरम्यान, आजपासून गॅस सिलिंडरचा दर, क्रेडिट कार्डचे नियम अशा अनेकांत बदल झाला आहे. हे बदल नेमके कोणते आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे. तसे न केल्यास तुमच्या खिशावर थेट परिणाम पडू शकतो.
एसबीआयच्या क्रेडिट कार्ड नियमांत बदल
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय स्टेट बँक अर्तात एसबीआयने आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल केला आहे. गेमिंग प्लॅटफॉर्म तसेच मर्चेंटशी संबंधित कोणत्याही क्रेडिट कार्डच्या ट्रान्झिशनवर ही बँक रिवॉर्ड पॉइंट्स देणार नाही.
एयू स्मॉल फायनान्स बँक
22 डिसेंबरपासून एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या इक्सिगो एयू क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंट सिस्टममध्ये बदल होणार आहे. शिक्षण, सरकारी सेवा, किराया, बीबीपीएस संदर्भातील व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.
अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड
येत्या 20 डिसेंबरपासून अॅक्सिस बँकदेखील आपल्या क्रेडिट कार्डची फीस आणि चार्जेसमध्ये बदल करणार आहे. वित्त शुल्क 3.6 टक्क्यांनी वाढवून ते 3.75 टक्के प्रति महिना केले जाणार आहे. तसेच चेक परत आला त्याची फी 450 रुपयांनी वाढवून तो 500 रुपये केली जाणार आहे.
बँकांना सुट्ट्या किती असणार?
डिसेंबर महिन्या सुट्ट्या किती असणार याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहिती दिली आहे. या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात बँकांना एकूण 17 दिवस सुट्ट्या असणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये राज्या-राज्यांनुसार बदल होऊ शकतो. त्यामुळे बँकेत जाण्याअगोदर सुट्ट्यांचे दिवस लक्षात ठेवावेत.
फ्री आधार अपडेट
तुम्हाला आधार कार्डमध्ये फोटो, नाव, पता, लिंग यात बदल करायचा असेल तर तुम्हाला 14 डिसेंबरपर्यंत ते मोफत करता येईल. 14 डिसेंबरनंतर आधार कार्डमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला शुल्क भरावे लागेल. आधार कार्डमध्ये बदल करायचे असतील तर माय आधार पोर्टलवर जाऊन ते करता येतील.
मालदीव टूर महागणार
या महिन्यापासून मालदीवची यात्रा महागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार इकोनॉमी क्लासमधून प्रवास करण्यासाठीचे शुल्क 30 डॉलर्सहून (2532 रुपए) 50 डॉलर्स (4220 रुपए) करण्यात येणार आहे. बिझनेस क्लाससाठी हे शुल्क 60 डॉलर्सहून (5064 रुपए) 120 डॉलर्स (10129 रुपए) मोजावे लागतील.
हेही वाचा :
मत्स्यशेतीतून शेतकरी बनले करोडपती, एकाच गावात 40 मत्स्यकेंद्र, वर्षभरात मिळतो दीड ते 2 कोटींचा नफा