देश कंगाल, पण 'या' लोकांकडे पाण्यासारखा पैसा, जाणून घ्या अफाट श्रीमंत असणाऱ्याकडं नेमकी किती संपत्ती?
Top Five Richest Person in Pakistan : पाकिस्तानची (Pakistan) आर्थिक स्थिती संपूर्ण जगाला माहीत आहे. मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात गरिबी आहे. मात्र, येथील काही लोकांकडे मोठी संपत्ती आहे.
Top Five Richest Person in Pakistan : पाकिस्तानची (Pakistan) आर्थिक स्थिती संपूर्ण जगाला माहीत आहे. या देशाचे कर्ज दर पाच वर्षांनी दुप्पट होते. 1997 आणि 2022 दरम्यान, त्याचे कर्ज वार्षिक 14 टक्क्यांनी वाढले आहे. पण GDP फक्त 3 टक्क्यांनी वाढला आहे. पाकिस्तानात महागाई शिगेला पोहोचली आहे, लोकांना खाद्यपदार्थांसाठीही मोठी रक्कम मोजावी लागत आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी आयएमएफने पाकिस्तानला अनेकवेळा कर्जही दिले आहे. मात्र, या गरिब देशात असे काही लोक आहेत, की त्यांच्याकडे पाण्यासारखा पैसा आहे. जाणून घेऊयात पाकिस्तानमधील पाच सर्वात श्रीमंत व्यक्तींची माहिती.
पाकिस्तानातील 5 श्रीमंत लोक कोणते?
कर्जबाजारी पाकिस्तानची स्थिती फारच चिंताजनक आहे. मात्र तेथील काही श्रीमंतांकडे लाखो कोटी रुपये आहेत. शाहिद खान हा पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. जर आपण तेथील शीर्ष 5 श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती एकत्र केली तर, एकूण संपत्ती मुकेश अंबानींच्या एकूण संपत्तीपेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानातील टॉप पाच श्रीमंत कोण आहेत आणि त्यांच्याकडे किती संपत्ती आहे याबाबतची माहिती जाणून घेऊया.
शाहिद खान हा पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत व्यक्ती
शाहिद खान हा पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. तो पाकिस्तानात नसून अमेरिकेत राहतो. शाहिद खान हा व्यापारी आणि ऑटो सप्लायर कंपनी फ्लेक्स एन गेटचा मालक आहे. याशिवाय तो अमेरिकन फुटबॉल संघ जॅक्सनविल जग्वार्सचाही सन्मानित आहे. फोर्ब्सनुसार, शाहिद खानची एकूण संपत्ती 13.7 अब्ज डॉलर आहे.
मियाँ मुहम्मद मनशा दुसऱ्या क्रमाकांचे श्रीमंत व्यक्ती
मियाँ मुहम्मद मनशा कंगल हे पाकिस्तानातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ते पाकिस्तानात राहतात आणि मोठे व्यापारी म्हणून त्यांची ओळख आहे. ते पाकिस्तानच्या MCB बँकेचे अध्यक्ष आहेत. स्वातंत्र्यानंतर त्यांचे कुटुंब भारतातून पाकिस्तानात गेले. त्याच्या संपत्तीबद्दल, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे की त्यांची एकूण संपत्ती 5 अब्ज डॉलर्स आहे.
अन्वर परवेझ तिसऱ्या क्रमांकावर
अन्वर परवेझ हे पाकिस्तानचे तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते ब्रिटनमध्ये राहतात आणि बेस्टवे ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. बेस्टवे ही पाकिस्तानातील दुसऱ्या क्रमांकाची सिमेंट उत्पादक कंपनी आहे. अन्वर परवेझची एकूण संपत्ती 3 अब्ज डॉलर्स आहे.
नासिर शॉन किती श्रीमंत आहे?
नासिर शोन हे पाकिस्तानचे मोठे उद्योगपती म्हणून ओळखले जातात. पाकिस्तानच्या बँकिंग आणि कापड उद्योगातील ते एक मोठे नाव आहे. ते शॉन ग्रुपचे सीईओ आहेत आणि रोल्स रॉयस कार खरेदी करणारे शॉन हे पाकिस्तानमधील पहिले व्यक्ती होते. नसीरची एकूण संपत्ती एक अब्ज डॉलर्स आहे.
रफिक एम. हबीब रफिक
एम. हबीब हे पाकिस्तानातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ते 'हाऊस ऑफ हबीब' आणि 'हबीब बँक लिमिटेड'शी संबंधित आहेत, जो त्यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे. यामध्ये 1841 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या 'हबीब हाऊस' समूहाचा समावेश आहे. त्यांचा व्यवसाय विमा, शिक्षण, रुग्णालय असा आहे. त्याची एकूण संपत्ती 950 दशलक्ष डॉलर्स आहे.