(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Term Insurance: आजच खरेदी करा 'टर्म इन्शुरन्स', कमी प्रीमियममध्ये मिळेल अधिक कव्हरेज
Term Insurance Plan: कोरोना महामारीच्या काळात विमा योजनेबाबत लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण झाली आहे.
Term Insurance Plan: कोरोना महामारीच्या काळात विमा योजनेबाबत लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण झाली आहे. आजकाल लोक विमा पॉलिसीमध्ये टर्म इन्शुरन्स प्लॅन घेण्यास सर्वाधिक पसंती देतात. मासिक पगारावर अवलंबून असणाऱ्यांनी टर्म प्लॅन जरूर घ्यावा, असा सल्ला अनेकदा आर्थिक तज्ज्ञ देतात. हे विमाधारकाच्या कुटुंबाला आकस्मिक मृत्यू झाल्यास आर्थिक मदत पुरवते.
का खरेदी करावा टर्म प्लॅन?
जीवन विम्याचे आजकाल सर्वात लोकप्रिय पॉलिसी म्हणजे मुदत आयुर्विमा. कोणतीही अनुचित घटना घडल्यास सध्याच्या पगाराच्या किमान 10 ते 20 पट कव्हर तुमच्या कुटुंबियांना मिळते. कोरोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यासही यातून मदत दिली जाते.
आजच खरेदी करा टर्म प्लॅन
विमा तज्ञांचे असे मत आहे की, कमीत कमी वयात टर्म प्लॅन घेतल्यास जास्तीत जास्त फायदा होतो. ही पॉलिसी 18 ते 65 वर्षे वयापर्यंत विकत घेतले जाऊ शकते. ग्राहकांनी 20 ते 25 वर्षांच्या संरक्षणासह विमा योजना खरेदी करावी, असे तज्ञांचे मत आहे. लहान वयात कमीत कमी आजार होत असल्याने ही योजना लहान वयातच खरेदी करणे योग्य ठरते. यासह तुम्हाला किमान प्रीमियम भरावा लागेल.
कमी प्रीमियममध्ये अधिक फायदे
ही योजना केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी खरेदी केली जाते. अशा परिस्थितीत पॉलिसीधारकाला जास्तीत जास्त कव्हरेज देते. हे तुमच्या सध्याच्या पगाराच्या 10 ते 20 पट कव्हर देखील देते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- भारताच्या बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीत 109% वाढ; डीजीसीआयएसची आकडेवारी
- केंद्र सरकाकडून एनडीएफसी कंपनीच्या नियमात बदल, आता 'या' अटीचं पालन बंधनकारकच
- Inflation rate : वाढता वाढता वाढे महागाई, मार्चमध्ये घाऊक महागाई दर थेट 14.55 टक्क्यांवर
- GST : जीएसटीतून 5 टक्के कराचा टप्पा वगळला जाणार? GST परिषदेत 'हे' निर्णय होण्याची शक्यता