भारताच्या बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीत 109% वाढ; डीजीसीआयएसची आकडेवारी
Rice Plant : भारताची बिगर बासमती तांदूळ निर्यात 2013-14 या आर्थिक वर्षातील $2,925 दशलक्ष वरून 2021-22 आर्थिक वर्षात $6,115 दशलक्ष इतकी आश्चर्यकारकपणे 109 टक्क्यांनी वाढली आहे.
Rice Plant : भारताची बिगर बासमती तांदूळ निर्यात 2013-14 या आर्थिक वर्षातील $2,925 दशलक्ष वरून 2021-22 आर्थिक वर्षात $6,115 दशलक्ष इतकी आश्चर्यकारकपणे 109 टक्क्यांनी वाढली आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्सने (DGCIS) ही आकडेवारी समोर आणली आहे.
डीजीसीआयएसच्या आकडेवारीनुसार, भारताने 2021-22 मध्ये जगभरातील 150 हून अधिक देशांमध्ये तांदूळ निर्यात केला. भारताने 2021-22 मध्ये नोंदवलेले 150 देशांपैकी 76 देशांना $1 दशलक्ष पेक्षा जास्त तांदूळ निर्यात केला. गेल्या काही वर्षांतील भारतातील तांदूळ निर्यातीमधील वैविध्य दाखवणारी ही आकडेवारी आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळण्यास आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात मदत झाली अशी प्रतिक्रिया या यशानंतर केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.
भारताने 2019-20 मध्ये $2,015 दशलक्ष किमतीचा बिगर-बासमती तांदूळ निर्यात केला होता, जो 2020-21 मध्ये $4,799 दशलक्ष आणि 2021-22 मध्ये $6,115 दशलक्ष झाला. 2021-22 मध्ये निर्यातीत 27 टक्के वाढ नोंदवली गेली आणि सर्व कृषी वस्तूंमध्ये बिगर-बासमती तांदूळ $6,115 दशलक्ष इतके परकीय चलन कमावणारा अव्वल होता असं डीजीसीआयएसची आकडेवारी सांगते.
कृषी निर्यातीत झालेली ही लक्षणीय वाढ देशातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची साक्ष म्हणूनही पाहिली जाते आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा, आसाम आणि हरियाणा ही मुख्य तांदूळ उत्पादक राज्ये आहेत. पश्चिम आफ्रिकन देश बेनिन हा भारतातून बिगर बासमती तांदळाचा प्रमुख आयातदार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Nashik News : नाशिकच्या कारागृहातील खळबळजनक प्रकार, तुरुंग अधिकाऱ्यानेच केली कैद्याची मदत
- Daund Crime : भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केल्याचा राग, 23 जणांच्या टोळक्याचा पोलिसासह मित्रांवर जीवघेणा हल्ला
- Cyber Cell : सोशल मीडियावर पोस्ट करताना सावधान! इनबॉक्समध्ये दिसेल सायबर पोलिसांची 'ही' नोटीस, आतापर्यंत 400 नोटीस पाठवल्या