एकाच वेळी दोन नोकऱ्या, वर्षभरात कमावले अडीच कोटी; तरुणाच्या कमाईचं कौतुक
एका तरुणाने एकाच वेळी दोन नोकऱ्या करत वर्षभरात सुमारे अडीच कोटी रुपये मिळवले (Earned) आहेत. तरुणाच्या या कमाईचं कौतुक होत आहे.
Business News : एखादे काम आणि त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करुन आपण सर्वजण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकून जातो. मात्र, एका तरुणाने एकाच वेळी दोन नोकऱ्या करत वर्षभरात सुमारे अडीच कोटी रुपये मिळवले (Earned) आहेत. नोकरी आणि कमाईच्या या आश्चर्यकारक पद्धतीमुळं सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. मात्र, ही कमाई त्याच्यासाठी पुरेशी नसल्याचे या तरुण तंत्रज्ञान व्यावसायिकाचे म्हणणे आहे. त्याला आणखी कमवायचे आहे. दोन नोकऱ्या करत असताना, त्याने तिसऱ्या नोकरीचे पर्यायही शोधला आहे. तो आठवड्यातून फक्त 40 तास काम करतो.
एकाच वेळी दोन नोकऱ्या करायच्या
बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, कॅलिफोर्नियास्थित या आयटी व्यावसायिकाने एकाच वेळी दोन नोकऱ्या निवडल्या आहेत. एकाच वेळी दोन्ही नोकऱ्या करून त्याने एका वर्षात अंदाजे 2.5 कोटी (3 लाख डॉलर) कमावले आहेत. या अहवालात त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. दोन वर्षांपासून हे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. अजूनही स्वत:ला श्रीमंत म्हणवण्याच्या स्थिती नसल्याचे या तरुणाने सांगितले आहे. मी खूप प्रयत्न केले का ही गोष्ट कोणाला कळू नये. पण, त्याला संशय आहे की माझ्या कमाईबद्दल बॉसला कळले आहे. मात्र, याचा माझ्यावर काहीच फरक पडत नाही किंवा त्याचे काम पूर्ण होत असल्याने तो गप्प बसल्याची माहिती दिली.
आतापर्यंत 1.2 कोटी रुपयांची बचत
या आयटी प्रोफेशनलने सांगितले की, त्याने हे काम 2021 पासून सुरु केले आहे. मात्र, मी माझ्या दोन ठिकाणच्या कामाबद्दल खूप विचार केला. या अतिरिक्त पैशाने मी घर खरेदी करू शकतो, सुट्टीवर लांब जाऊ शकतो किंवा लवकर निवृत्तीसाठी पैसे जमवू शकतो. सध्या त्याच्याकडे सुमारे 1.2 कोटी रुपये (1.5 लाख डॉलर) बचत आहे. पण, तरीही तो त्याची जुनी कार वापरतो. इकॉनॉमी क्लासने प्रवास करण्याव्यतिरिक्त तो स्वस्त हॉटेलमध्ये राहतो.
तिसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न
अहवालानुसार, गेल्या दोन वर्षांत त्याने दोनदा तिसऱ्या नोकरीसाठी प्रयत्नही केले होते. पण, नंतर हे शक्य होणार नाही हे त्याच्या लक्षात आले. एकाच वेळी दोन काम करणे हे अवघड काम असल्याचे त्यांनी सांगितले. पण, मेहनत आणि नशिबाच्या जोरावर त्याने ते केले. एका कंपनीच्या मीटिंगमध्ये बसून दुसऱ्या कंपनीचे काम तो करतो. दोन्ही नोकऱ्यांतून त्याने मिळवलेले कौशल्यही कामी आले आहे. तो नेहमी आपली कामे वेळेवर पूर्ण करत असतो. आठवड्यातून फक्त 40 तास काम करतो.
महत्त्वाच्या बातम्या: