कोणतंही काम न करता तिला मिळतात 3 कोटी, नोकरी एकूण व्हाल थक्क; सविस्तर माहिती एका क्लिकवर
सध्या एक मुलगी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. जी स्वतः काहीच करत नाही पण तिचे वार्षिक 3 कोटी रुपयांचे पॅकेज आहे.
Yelena Lala: नोकरी (Job) मिळवण्यासाठी जगभरातील अनेक लोक मोठं परिश्रम घेतात. कठोर अभ्यास करतात, पदव्या मिळवतात. त्यानंतरही अनेकांना नोकरी मिळत नाही. पुरुषांसह महिलाह देखील नोकरी मिळवण्यासाठी मोठी मेहनत घेतात. पण सध्या एक मुलगी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. जी स्वतः काहीच करत नाही पण तिचे वार्षिक 3 कोटी रुपयांचे पॅकेज आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. काहीही न करता वर्षाला 3 कोटी रुपये कमावणाऱ्या या मुलीचे नेमकं काम काय आहे? जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.
ही मुलगी तिच्या मैत्रिणीसाठी काम करते
न्यूयॉर्कमधील येलेना लाला (Yelena Lala) नावाची मुलगी खूप शिकलेली आहे. पण काम काहीच करत नाही. मला बॉयफ्रेंड आहे मग मी काम का करू. येलेना लालाने तिच्या प्रियकराचे नाव सांगितले नाही परंतु तिने सांगितले की तिचा सर्व खर्च तिचा प्रियकर करतो. तिची बिले कितीही असली तरी तिचा प्रियकर देतो. येलेना लालाने सांगितले की, तिच्या बॉयफ्रेंडसोबत तिचे नाते 2020 मध्ये सुरू झाले. तेव्हापासून दोघेही एकत्र राहतात. तिने सांगितले की तिचा प्रियकर टेक इंडस्ट्रीत काम करतो.
55 वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास केला प्रवास
येलेना लाला आणि तिच्या प्रियकराने आतापर्यंत एकूण 55 देशांना भेटी दिल्या आहेत. येलेनाच्या प्रियकराने सहलीचा संपूर्ण खर्च उचलला. अलीकडेच तिचा प्रियकर तिला खासगी जेटमधून भेटायला आला होता. येलेना सांगते की ती प्रवासाशिवाय कोणतेही काम करत नाही. जेव्हा ती थकते तेव्हा ती झोपते. ती म्हणते की तिचे एकमेव काम आहे तिच्या प्रियकरावर प्रेम करणे आणि त्याची काळजी घेणे. तिचा प्रियकर उर्वरित खर्च भागवण्यासाठी काम करतो.
महत्त्वाच्या बातम्या: