Budget 2020 | आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपतींच्या अभिभाषणाकडे सर्वांचं लक्ष
आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असून राष्ट्रपतींचं अभिभाषण होणार आहे. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2019-2020 आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत.
नवी दिल्ली : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती कोविंद सकाळी 11 वाजाता दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमन वर्ष 2019-2020चं आर्थिक सर्वेक्षण सादर करतील. आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमिवर मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प उद्या 1 फेब्रुवारीला सादर होत आहे. विकास दर अवघा 5.8 टक्के असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं सांगितलं आहे. गेल्या 6 वर्षातला हा नीचांकी जीडीपी आहे. देशात बेरोजगारीही वाढली आहे. त्यामुळे पुढील काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून मोदी सरकारसाठी हा अर्थसंकल्प महत्वाचा ठरणार आहे.
सरकारचं विजय डॉक्यूमेंट समजलं जातं राष्ट्रपतींचं अभिभाषण
राष्ट्रपतींचं अभिभाषण सरकारचं विजय डॉक्यूमेंट समजलं जातं. आजच्या अभिभाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद मोदी सरकारच्या अजेंड्यासोबतच 2024पर्यंत मोदी सरकारच्या भावी योजनांची रूपरेषाही देशासमोर मांडणार आहेत. राष्ट्रपती सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी संसद भवनात पोहोचतील. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती त्यांचं स्वागत करतील.
2019-20 चं आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाणार
राष्ट्रपतींचं अभिभाषण सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर अर्ध्या तासाने संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला सुरुवात करण्यात येईल. ज्यामध्ये सरकारच्या वतीने 2019-20 मधील आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात येईल. दरम्यान, सध्या देशाचा विकास दर अवघा 5.8 टक्के असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं सांगितलं आहे. गेल्या 6 वर्षातला हा नीचांकी जीडीपी आहे. तसेच देशात बेरोजगारीही वाढली आहे. संसदेचं अधिवेशन आजपासून सुरू होऊन 3 एप्रिलपर्यंत असणार आहे. यादरम्यान एक फेब्रुवारी रोजी वित्तीय वर्ष 2020-21चा अर्थसंकल्प सादर करण्यात येईल.
एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प
बजेट सत्रातील मुख्य आकर्षण हे एक फेब्रुवारी रोजी सादर होणारा अर्थसंकल्प आहे. सध्या देशाचा विकास दर अवघा 5.8 टक्के असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं सांगितलं आहे. गेल्या 6 वर्षातला हा नीचांकी जीडीपी आहे. अशा परिस्थिती मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. विकास दरात सुधारणा करण्यासाठी हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचंही बोललं जात आहे. याव्यतिरिक्त अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. अभिभाषणात राष्ट्रपती मोदी सरकारच्या अजेंड्यासोबतच 2024 पर्यंतच्या त्यांच्या कामाची रूपरेषाही मांडणार आहेत. दोन भागांमध्ये चालणाऱ्या सत्राचा पहिला भाग 31 जानेवारीपासून 11 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. तर, दुसरा भाग 2 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत असणार आहे.
संबंधित बातम्या :
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा यंदाचा अखेरचा अर्थसंकल्प?
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीत
देशातील भ्रष्टाचार थांबता थांबेना; भ्रष्ट देशांच्या यादीत भारताचं रँकिंग घसरलं
देशाचा जीडीपी 4.5% नव्हे तर 1.5% आहे; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा दावा