Dhurandhar BO Day 10: 'धुरंधर'नं दुसरा आठवडा गाजवला, 'पुष्पा 2', 'छावा'लाही पछाडलं; आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती नोटा छापल्यात?
Dhurandhar Box Office Collection Day 10: दुसऱ्या आठवड्याच्या कमाईसह, 'धुरंधर' सिनेमानं 'पुष्पा 2' लाही मागे टाकलं आहे, भारतात फक्त 10 दिवसांत 'धुरंधर'नं 350 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

Dhurandhar Box Office Collection Day 10: आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित 'धुरंधर' सध्या तुफान कमाई करतोय. दिवसेंदिवस या सिनेमाची क्रेझ वाढताना दिसतेय. स्पाय अॅक्शन सिनेमा असलेला 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर (Dhurandhar Box Office Collection) अक्षरशः धुमाकूळ घालतोय. सिनेमात मुख्य भूमिकेत रणवीर सिंह (Ranveer Singh) झळकला असला तरीसुद्धा या सिनेमात रहमना डकैत साकारलेला अक्षय खन्ना (Akshaye Khanna) मात्र भाव खाऊन गेलाय. अक्षय खन्नाच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होतंय आणि यामुळेच सिनेमाचीही लोकप्रियता जबरदस्त वाढली आहे.
रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांचा 'धुरंधर' हा सिनेमा 5 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं पहिला आठवडा पूर्ण केला, तर रविवारी या चित्रपटानं दुसरा आठवडा ओलांडला आहे. हा सिनेमा संपूर्ण आठवडाभर चर्चेचा राहिला आहे. आता, सिनेमाच्या रविवारच्या कलेक्शनबाबत बोलायचं झालं तर, 'धुरंधर' सिनेमाची कमाई अतुलनीय आहे. खरंच, दुसऱ्या आठवड्याच्या कमाईसह, 'धुरंधर' सिनेमानं 'पुष्पा 2' लाही मागे टाकलं आहे, भारतात फक्त 10 दिवसांत 'धुरंधर'नं 350 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
'धुरंधर'चं दहाव्या दिवसाचं कलेक्शन
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, 'धुरंधर'नं रिलीजच्या दहाव्या दिवशी, रविवारी 59 कोटी कमावले आहेत. यामुळे चित्रपटाचं भारतातील आतापर्यंतचं एकूण कलेक्शन 351.75 कोटी आणि जगभरातील कमाई 530.75 कोटी झाली आहे. भारतातील कमाईच्या बाबतीत, 'धुरंधर'चं कलेक्शन आता 420.75 कोटींवर पोहोचलं आहे.
View this post on Instagram
'धुरंधर'नं किती कमावलेले? (Dhurandhar Movie Box Office Collection)
'धुरंधर' सिनेमानं पहिल्या दिवशी 28 कोटींची ओपनिंग केलेली, ज्यानंतर दुसऱ्या दिवशी हा आकडा 32 कोटींवर पोहोचलेला. यानंतर आता तिसऱ्या दिवशी 'धुरंधर'नं 43 कोटींचं कलेक्शन केलेलं. तर, चौथ्या दिवशी सिनेमानं 23.25 कोटींची कमाई केलेली. तर, पाचव्या दिवशी 27 कोटींची धुवांधार कमाई केलेली. सातव्य दिवशी 27 कोटीं आणि आठव्या दिवशी फिल्मनं 32.5 कोटींची कमाई केलेली. नवव्या दिवशी 'धुरंधर'नं 53 कोटींचा आकडा गाठलेला.
'धुरंधर'चे वाढवले मीडनाईट शो
धुरंधरच्या वाढत्या मागणीमुळे, मुंबई आणि पुण्यात रात्रीचे शो वाढवण्यात आले आहेत, आता शो रात्री 12.50, 1.25, 1.25, 2.30, 3.00, 3.30, 3.35, 4.05 आणि अगदी पहाटे 4.10 वाजताही सुरू आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























