Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report
संगमनेर बिबट्याच्या हल्यात चार वर्षीय मुलाचा मृत्यू.. मृतदेह पाहताच आजीचे अश्रू अनावर... बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश.
अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून विशेषत ग्रामीण भागात बळीराजा संकटात सापडलाय.. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावातील चार वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करत ठार केल्याची घटना काल संध्याकाळी घडलीय.. आज सकाळी एकुलत्या एक मुलाचा मृतदेह गावात येताच आजीच्या अश्रूंचा बांध फुटला आणि सगळा परिसर निशब्द झाला.. सदर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याचा दावा वनविभागाने केला असून अजूनही परिसरात अनेक बिबटे यासह तरस देखील परिसरात असून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी पुढे आलीय..
व्हिओ --- संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्याने सिद्धेश कडलग या चारवर्षीय चिमुकल्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली.. यामुळे चिमुकल्याचे नातेवाईक व ग्रामस्थ संतप्त झाले होते.. जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.. आज सकाळी शासनाने तात्काळ दखल घेत बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले.. यावेळी मृतदेह गावात येताच प्रत्यक्षदर्शी असलेल्या आजींच्या अश्रूंचा बांध फुटला..ग्रामस्थानी गाव कडकडीत बंद ठेवत घटनेचा निषेध केलाय.. यावेळी आजीने घडलेल्या घटनेची माहिती दिली मात्र यावेळी आजीच्या मनातून चार वर्षीय सिद्धेशची आठवण येत असताना अश्रू येत होते..
बाईट --- आजी व प्रत्यक्षदर्शी
व्हिओ --- बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले असले तरी आत्ता यापुढे आम्हीच बिबट्याला ठार करू असा आक्रोश वडील सुरज कडलग यांनी केला..
बाईट --- सूरज कडलग, वडील
व्हिओ --- या परिसरात अनेक बिबटे असून यासह तरस प्राण्याने देखील बळीराजा संकटात असून गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी भरदिवसा बिबटे फिरत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केलाय..याबाबत अनेकदा आपल्या कॅमेरात बिबटे व तरस कैद केलेल्या ग्रामस्थाने भूमिका मांडताना वनविभागाने बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी केलीय .. तर घटना घडण्यापूर्वी याच परिसरात बिबट्याला पाहणाऱ्या ग्रामस्थाने एबीपी माझाशी बोलताना किस्सा सांगितलाय...
चौपाल विथ ग्रामस्थ ऑन स्पॉट...
व्हिओ --- दरम्यान घटनेनंतर वनविभागाने रात्रीपासूनच शोध मोहीम सुरू केली होती... ड्रोनच्या माध्यमातून शोध घेत असताना अनेक ठिकाणी बिबट्यांचा संचार त्यांना दिसून आला... मात्र दुपारच्या वेळेस घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं... वन विभागांना हा नरभक्षक बिबट्या असल्याचा दावा केला असला तरी परिसरात अजूनही बिबट्यांचा मुक्त संचार असल्याने नेमका बिबट्या कोणता हे आगामी काळात स्पष्ट होईल...
नितीन ओझा, शिर्डी
All Shows

































