एक्स्प्लोर

Nashik Crime: आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला! हळदीच्या कार्यक्रमातच टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, नेमकं काय घडलं?

Nashik Crime : नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून 21 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Nashik Crime : नाशिकच्या मखमलाबाद रोडवरील (Makhmalabad Road) महादेव कॉलनी परिसरात सुरू असलेल्या हळदीच्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून 21 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने पोटात वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) चौघांविरोधात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्श नितीन कामे (वय 21, रा. कुमावतनगर, पूनम किराणाशेजारी, पंचवटी) हा युवक या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी अमोल धनराज कुमावत (वय 37, रा. सप्तशृंगी निवास, कुमावतनगर, मखमलाबाद रोड, पंचवटी) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Nashik Crime : किरकोळ कारणावरून वाद

तक्रारीनुसार, 12 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मखमलाबाद रोडवरील महादेव कॉलनीतील मनोहर अपार्टमेंट येथे मवर कुमावत यांचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी अमोल कुमावत व स्पर्श कामे हे नाचत असताना स्पर्शचा चंद्रभान गणपत चोथवे याला धक्का लागला. या किरकोळ कारणावरून दोघांत वाद निर्माण झाला.

Nashik Crime : “तुझा मर्डर करून टाकतो”

वादानंतर चंद्रभान चोथवे याने सुमित बोडके व इतर दोन साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर सुमित बोडके याने “तुझा मर्डर करून टाकतो” अशी धमकी देत स्पर्श कामे याच्या डाव्या बाजूच्या बरगड्यांच्या खाली धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात स्पर्श कामे गंभीर जखमी झाला. भांडण सोडविण्यासाठी अमोल कुमावत मध्ये पडले असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत “तुम्हालाही बघून घेऊ” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Nashik Crime : एका आरोपीला अटक

घटनेनंतर जखमी स्पर्श कामे याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी सुमित बोडके, चंद्रभान गणपत चोथवे (23, रा. क्रांतीनगर, तरसे चाळ, मखमलाबाद रोड) तसेच त्याच्या दोन साथीदारांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. यातील चंद्रभान चोथवे याला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत. लग्नसोहळ्यासारख्या आनंदाच्या कार्यक्रमाला हिंसक वळण लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune Crime News: आधी धमक्या नंतर वाद मिटवण्यासाठी भेटायला बोलावलं अन्...; प्रियकरानं प्रेयसीच्या नवऱ्याला क्रूरपणे संपवलं; घटनेनं जेजुरी हादरलं

Video : जीवाची पर्वा न करता हल्लेखोराला एकट्यानं लोळवलं, दहशतवाद्याकडून रायफल हिसकावली अन्...;  सिडनीमधील रियल हिरोचं जगभर कौतुक

महत्त्वाच्या बातम्या

Mira Bhayandar Crime News: मध्यरात्री शिकारीसाठी जंगलात शिरले; काहीच सापडलं नाही, परताताना डोळे चमकले अन्..., गोळीबारात ग्रुपमधील एकाचा मृत्यू, मृतदेहावर पहाटेच उरकले अंत्यसंस्कार
मध्यरात्री शिकारीसाठी जंगलात शिरले; काहीच सापडलं नाही, परताताना डोळे चमकले अन्..., गोळीबारात ग्रुपमधील एकाचा मृत्यू, मृतदेहावर पहाटेच उरकले अंत्यसंस्कार
Bhandara Food Poisoning : दुर्गोत्सवाच्या जेवणातून 300 लोकांना विषबाधा; भंडाऱ्याच्या खराशी गावातील खळबळजनक प्रकार
दुर्गोत्सवाच्या जेवणातून 300 लोकांना विषबाधा; भंडाऱ्याच्या खराशी गावातील खळबळजनक प्रकार
Jitendra Awhad Pune Crime : सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
Amravati Police News: अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच गळ्याला दोर लावला, चिठ्ठीतून शेवटचा संदेश
अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच गळ्याला दोर लावला, चिठ्ठीतून शेवटचा संदेश

व्हिडीओ

Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
Satara DCC Bank : गावाला नडणाऱ्या जयकुमार गोरेंना सख्खा भाऊ भिडला, जिल्हा बँकेत एकमेकांविरोधात अर्ज, साताऱ्यात काट्याची लढाई
गावाला नडणाऱ्या जयकुमार गोरेंना सख्खा भाऊ भिडला, जिल्हा बँकेत एकमेकांविरोधात अर्ज, साताऱ्यात काट्याची लढाई
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
Satara DCC Bank Election : रामराजे ते शिवेंद्रराजे,सातारा जिल्हा बँक निवडणुकीतून दिग्गजांची माघार, कोण बिनविरोध? कोण रिंगणात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीतून दिग्गजांची माघार, कोण बिनविरोध? कोण रिंगणात?
Embed widget