John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
मुंबई : 'नेव्हर गिव्ह अप' असं म्हणत अवघ्या जगाला दोन दशकांहून जास्त काळ वेड लावणाऱ्या जॉन सीनानं (John Cena) अखेर गिव्ह अप केलं. पण, हे गिव्ह अप, करताना त्याच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात अश्रू होते. वॉशिंग्टनमध्ये पार पडलेल्या सॅटर्डे नाईट मेन इव्हेंटमधला सामना (Saturday Night’s Main Event) हा जॉन सीनाच्या रेसलिंग कारकीर्दीचा शेवटचा सामना होता.
गेल्या वर्षी जुलै महिन्यातच जॉन सीनानं WWE विश्वातून निवृत्त होणार अशी घोषणा केली होती. तेव्हापासूनच जॉन सीनाची फेअरवेल सीरिज सुरु झाली. वर्षभरात अनेक देशांमध्ये सामने खेळल्यानंतर वॉशिंग्टन डीसीच्या कॅपिटन वन स्टेडियममध्ये जॉन सीनाची शेवटची मॅच झाली.
रेसलिंग विश्वात जवळपास सगळेचं विश्वविक्रम मोडणारा, हॉलिवूडमध्येही अभिनयातून आपलं कसब दाखवणारा ग्लोबल आयकॉन अशी जॉन सीनाची ओळख बनली. 23 वर्षांच्या कारकीर्दीत जॉन सीनानं 2,320 सामने खेळले. त्यापैकी एक हजार 818 सामने जिंकले.
John Cena WWE Record : जॉन सिनाचा विश्वविक्रम
वर्ल्ड चॅम्पियन्सशीप - 17 वेळा
यू. एस. चॅम्पियन्सशीप - 5 वेळा
टॅग टीम चॅम्पियन्सशीप - 4 वेळा
रॉयल रम्बल विजेता - 2 वेळा
इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियन्सशीप - 1 वेळा विजयी.
John Cena Matches History : अनेक सामने जिंकत विक्रम
कर्ट अँकलपासून अंडरटेकरपर्यंत, शॉन मायकलपासून ब्रॉक लेसन्सरपर्यंत, सीएम फंकपासून रँडी ऑर्टनपर्यंत... इतकंच नाही तर अगदी अलीकडच्या काळातील रेसलर्स असलेल्या रोमन रिंग्जपासून कोडी ऱ्होड्सपर्यंत... जॉन सीनानं अशा अनेक चॅम्पियन्सला हरवत, एकापाठोपाठ एक सामना जिंकत, विक्रमांच्या पायऱ्या चढल्या.
All Shows

































