एक्स्प्लोर

देशाचा जीडीपी 4.5% नव्हे तर 1.5% आहे; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा दावा

106 दिवस तिहार जेलमध्ये घालवल्यानंतर चिदंबरम काल बाहेर आले. आज त्यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यानंतर ते पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात सक्रीय झाले आहेत. चिदंबरम यांनी आज राज्यसभेतही हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस मुख्यालयात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. चिदंबरम म्हणाले की, हे सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. जीडीपी आणि महागाईबद्दल बोलू दिले जात नाही, सरकारला प्रश्न विचारणाऱ्या लोकांना रोखले जात आहे. चिदंबरम म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलण्यास तयार नाहीत. सुरुवातीला नोटबंदी, त्यानंतर चुकीच्या पद्धतीने लागू केलेला जीएसटी, कर दहशतवाद या सर्व कारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. देशाचा जीडीपी सातत्याने घसरतोय. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशाचा जीडीपी 4.5 टक्के आहे. परंतु हे सत्य नाही. देशाचा जीडीपी 1.5 टक्के इतका खाली घसरला आहे. या आकड्यांवरुन स्पष्ट होतंय की, देशाची अर्थव्यवस्था मोडखळीस आली आहे. चिदंबरम म्हणाले की, देशभरात सर्व प्रकारच्या वस्तूंची विक्री कमी झाली आहे. कारण मुळात लोकांची मागणीच कमी झाली आहे. लोकांकडे पैसे नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येदेखील भीतीचे वातावरण आहे. युपीए सरकारच्या कार्यकाळात आम्ही देशातील 14 कोटी लोकांना गरीबीमधून बाहेर काढले. परंतु एनडीएने 2016 नंतर लाखो लोकांना पुन्हा गरीब केलं आहे. अर्थव्यवस्थेवरील मंदीचे सावट दूर करता येईल, परंतु हे सरकार त्यामध्ये अपयशी ठरले आहे. 106 दिवस तिहार जेलमध्ये घालवल्यानंतर चिदंबरम काल बाहेर आले. चिदंबरम म्हणाले की, 106 दिवसांनंतर मी तुमच्याशी बोलतोय. याचा मला खूप आनंद होतोय. सुप्रीम कोर्टाने काल माझ्याबाबत जो फैसला दिला, त्याबद्दल मी आभारी आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर मी सध्या काही बोलणार नाही. पाहा काय म्हणाले चिदंबरम? वाचा : मोदींच्या कार्यकाळात विकासदर पुन्हा घसरला, जीडीपीने गाठली निचांकी पातळी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget