IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
IND vs SA : भारतानं दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या टी 20 सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासह भारतानं मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.

धर्मशाला : भारतानं तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेला विकेटनं पराभूत केलं आहे. भारताच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं. अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी दमदार गोलंदाजी केली. एडन मारक्रम यानं 61 धावा केल्या. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली. तिसऱ्या टी 20 मधील विजयासह भारतानं मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. भारतानं दक्षिण आफ्रिकेला 7 विकेटनं पराभूत केलं.
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलनं अर्धशतकी भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. भारताच्या 60 धावा झाल्या असताना अभिषेक शर्मा 35 धावांवर बाद झाला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरलेल्या शुभमन गिलला या मॅचमध्ये फॉर्म गवसला. शुभमन गिलनं 28 धावा करुन बाद झाला. कॅप्टन सूर्यकमार यादव 12 धावा करुन बाद झाला. तिलक वर्मानं 26 धावा केल्या, तर शिवम दुबेनं 10 धावा केल्या.
भारताच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी
अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी एक एक विकेट घेतली. यामुळं दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 ओव्हरमध्ये 117 धावा करु शकला. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मारक्रम यानं 61 धावांची खेळी केली. कॅप्टन एडन मारक्रम खेळपट्टीवर एक बाजू लढवत होता. मात्र, दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज बाद होत राहिले. दक्षिण आफ्रिकेच्या बहुतांश खेळाडूंना दोन आकडी धावसंख्या देखील करता आली नाही.
अर्शदीप सिंगचं कमबॅक
अर्शदीप सिंगनं दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 54 धावा दिल्या होत्या. अर्शदीपनं तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये कमबॅक करत 4 ओव्हरमध्ये 2 विकेट घेत 13 धावा दिल्या. अर्शदीप सिंगनं दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये 7 वाईड बॉल टाकल्यानं त्याच्यावर टीका झाली होती. मात्र, त्या अपयशातून सावरत अर्शदीपनं यानं टी 20 क्रिकेटमधील भारताचा आघाडीचा आणि महत्त्वाचा गोलंदाज असल्याचं दाखवून दिलं.
भारताची मालिकेत आघाडी
भारतानं धर्मशाला येथील तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता चौथी टी 20 मॅच 17 डिसेंबरला लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर होईल. तर, पाचवी टी 20 मॅच नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे 19 डिसेंबरला होणार आहे. पुढील सामन्यात विजय मिळवत आणखी एक मालिका जिंकण्याची संधी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाकडे आहे.





















