Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत, पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केलाय.. बऱ्याच काळापासून रखडलेल्या भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पेच जवळपास सुटल्यात जमा झालाय.. भाजपकडून नव्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी, बिहारचे मंत्री नितीन नवीन यांची निवड करण्यात आलीय.. ४५ वर्षीय नितीन नवीन हे भाजपचे आतापर्यंतचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष ठरलेत... जे पी नड्डा यांचा अध्यक्षपादाचा कार्यकाळ संपला आहे.. त्यामुळे नितीन नवीन भविष्यात विद्यमान पासष्ठ वर्षीय भाजप अध्यक्ष जेपी नड्डांची जागा घेऊ शकतात... भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ही नियुक्ती भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाने केली आहे..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन नबीन यांची भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केलंय.. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय..























