(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Budget 2022 : अर्थसंकल्पासाठी सरकारकडे पैसा कुठून येतो आणि कसा खर्च होतो, जाणून घ्या
Union Budget 2022 : अर्थसंकल्प म्हणजे संपूर्ण आर्थिक वर्षातील सरकारच्या कमाई आणि खर्चाच्या तपशिलांसह अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी घोषणा.
Union Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा चौथा अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्प म्हणजे संपूर्ण आर्थिक वर्षातील सरकारच्या कमाई आणि खर्चाच्या तपशिलांसह अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी घोषणा.
सरकार सर्वसामान्यांसाठी योजना जाहीर करते. विविध क्षेत्रांसाठी घोषणा करते. विविध मंत्रालये आणि विभागांसाठी बजेटची तरतूद केली जाते, जी वर्षभर विविध खर्च आणि योजनांसाठी वापरतात. अशा परिस्थितीत सरकार अर्थसंकल्पात कशासाठी घोषणा करते, सरकारकडे महसूल कोठून येतो आणि सरकारला मिळणारा महसूल कुठे खर्च होतो, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होतो. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करुया..
व्याज भरण्यासाठी सर्वाधिक खर्च
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सरकारने चालू आर्थिक वर्ष 2021-22 साठी 35 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये सरकारने सादर केलेल्या तपशिलानुसार, सरकारला कर्ज आणि इतर दायित्वांमधून एका रुपयात 36 पैसे मिळतात, तर ते सर्वाधिक खर्च व्याज भरण्यासाठी करते. एका रुपयात 20 पैसे व्याजावर खर्च करण्याचा सरकारचा अंदाज आहे.
अशी आहे सरकारची कमाई
(एक रुपयाचे खाते)
कर्ज आणि इतर दायित्वे - 36 पैसे
जीएसटी- 15 पैसे
प्राप्तिकर - 14 पैसे
निगम कर- 13 पैसे
केंद्रीय उत्पादन शुल्क- 8 पैसे
विविध महसुलातून कर - 6 पैसे
कर्जाव्यतिरिक्त भांडवली उत्पन्न - 5 पैसे
सीमाशुल्क - 3 पैसे
सरकारी पैसा असा खर्च होतो (एक रुपयाचे खाते)
सरकारला महसूल मिळतो, तो विविध वस्तूंवर खर्च होतो. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार कर्जावरील व्याज भरण्यासाठी सर्वाधिक खर्च केला जातो.
एका रुपयाचा अंदाजे किती भाग कोणत्या गोष्टींवर खर्च केला गेला याचे तपशील खाली दिले आहेत-
व्याज भरण्यासाठी - 20 पैसे
कर आणि शुल्कांमध्ये राज्यांचा वाटा - 16 पैसे
केंद्रीय क्षेत्रातील योजना - 13 पैसे
वित्त आयोग आणि इतर हस्तांतरण - 10 पैसे
केंद्र पुरस्कृत योजना - 9 पैसे
आर्थिक सहाय्य - 9 पैसे
संरक्षण - 8 पैसे
पेन्शन - 5 पैसे
इतर खर्च - 10 पैसे
(डिस्क्लेमर: हा अर्थसंकल्प चालू आर्थिक वर्षाचा आहे. आगामी आर्थिक वर्ष 2022-22 मध्ये सरकारला महसूल कुठून मिळणार आणि तो कुठे खर्च केला जाणार आहे, याचा तपशील अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर समोर येईल. पुढील आर्थिक वर्षातही सरकारचे उत्पन्न आणि खर्चाचे आकडे आणि गुणोत्तर चालू आर्थिक वर्षात सारखेच राहिले पाहिजे असे गरजेचे नाही)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Budget 2022 on App: इंग्रजी किंवा हिंदीत वाचू शकाल अर्थसंकल्प; केंद्र सरकारने लॉन्च केलं अॅप
- Budget 2022: अर्थसंकल्प 2022 पासून ऑटोमोबाईल क्षेत्राच्या अपेक्षा काय, गाडी घेणं स्वस्त होणार का?
- Budget 2022: पीएफमध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा वाढणार?; अर्थमंत्र्यांच्या घोषणेकडे लक्ष
- Budget 2022 : किती लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असावं?; लोक म्हणतात...