Budget 2022 : किती लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असावं?; लोक म्हणतात...
टॅक्समध्ये केंद्र सरकार काही सूट देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री टॅक्स भरणाऱ्याला सूट देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Budget 2022 Poll : गेल्या दोन वर्षापासून कोविडमुळे जवळपास सर्वच क्षेत्रांना आणि उद्योगांना अनेक मार्गांनी हानी पोहोचवली आहे. त्यामुळे एक फेब्रुवारी रोजी होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना मोठ्या आपेक्षा आहेत. आपल्या वार्षिक कमाईवर किती टॅक्स लागेल.. याकडे नागरिक लक्ष ठेवून आहेत. टॅक्समध्ये केंद्र सरकार काही सूट देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री टॅक्स भरणाऱ्याला सूट देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भातच ABP News ने ट्वीटरवर एक सर्व्हे घेतला आहे. यामध्ये लोकांनी आपलं मत नोंदवलं आहे.
ABP News ने आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावर टॅक्स स्लॅबबाबत एक सर्व्हे घेण्यात आला आहे. यामध्ये 2279 लोकांनी सहभाग घेतला आहे. #JanManDhanOnABP | बजटमध्ये इनकम टॅक्स सूटमध्ये सध्यस्थिती 2.50 लाख रुपयांवरुन किती करावे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यासाठी 3 लाख, 4 लाख आणि 5 लाख असे तीन पर्याय देण्यात आले होते.
सर्व्हेचा निकाल काय आला ?
2279 पैकी 78.3 लोकांनी तिसऱ्या पर्याय निवडला आहे. 78.3 टक्के लोकांच्या मते टॅक्समधील सूट मिळण्याची मर्यादा वाढून 5 लाख करण्यात यावी. 10.8 टक्के लोकांनी चार लाख असलेला दुसरा पर्याय निवडला आहे. तर 10.9 लोकांनी तीन लाख असलेला पहिला पर्याय निवडला आहे.
#JanManDhanOnABP | बजट में इनकम टैक्स छूट की मौजूदा सीमा को 2.50 लाख रुपये से बढ़ाकर कितना करना चाहिए? #UnionBudget2022 #Budget2022
— ABP News (@ABPNews) January 27, 2022
टॅक्स स्लॅब कसा आहे?
सध्यास्थितीला 2.50 लाख रुपयांच्या वार्षिक कमाईवर कोणताही टॅक्स लागत नाही. 2.50 लाख ते 5 लाख पर्यंतच्या वार्षिक कमाईवर पाच टक्के टॅक्स आकारला जातो. पण सरकारने पाच टक्के टॅक्सवर 87 ए नियमांनुसार 12500 रुपयांची सूट दिली आहे. त्यामुळे पाच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या टॅक्स भरावे लागत नाही. पाच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स भरावा लागतो. ज्याचं वार्षिक उत्पन्न पाच लाख ते दहा लाख यादरम्यान असेल तर त्याला 20 टक्के टॅक्स भरावा लागेल. 87 ए नियमांनुसार 12500 रुपयांची सूट दिली आहे. दहा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तीस टक्के टॅक्स भरावा लागतो.