Old Coin : 25 पैशांचे नाणे विकून व्हा करोडपती, कसं काय ते जाणून घ्या सविस्तर
जर तुमच्याकडे 25 पैशांचे चांदीचे नाणे असेल तर तुम्ही ते ऑनलाईन बाजारात विकू शकता. ज्यामुळे तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात.
मुंबई : तुम्हाला लाखो रुपये कमवायचे असतील, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही क्षणार्धात श्रीमंत होऊ शकता. जर तुम्हाला नाणी किंवा नोटा जमा करण्याचा छंद असेल तर कधी कधी हा छंद तुम्हाला लखपती किंवा करोडपती बनवू शकतो. अनेक वेळा, जुनी नाणी ताब्यात ठेवल्याने त्यांचे मूल्य नंतर लक्षणीय वाढते. ज्यामुळे तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात.
जर तुमच्याकडे 25 पैशांचे चांदीचे नाणे असेल तर तुम्ही ते ऑनलाईन बाजारात विकू शकता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नाण्याची किंमत 1.50 लाख रुपयांपर्यंत आहे. वास्तविक, Quikr वेबसाइटवर या विशिष्ट प्रकारच्या नाण्याची किंमत लाखो रुपये ठेवण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Indiamart.com वर जुन्या नाणी आणि नोटांसाठी बोली लावण्यात येते. जर तुमच्याकडे असे नाणे असेल आणि तुम्हाला ते विकायचे असेल तर प्रथम तुम्हाला Quikr वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्ही तुमचे नाणे पेमेंट आणि डिलिव्हरीच्या अटींनुसार विकू शकता. यासोबतच तुम्ही या प्लॅटफॉर्मवर बार्गेनिंग करू शकता. जुनी नाणी आणि नोटांसाठी indiamart.com (indiamart.com) वरही बोली लावली जाते. तुम्हाला या विशिष्ट नाण्याचा फोटो वेबसाइटवर अपलोड करावा लागेल. अपलोड केल्यानंतर लोक या नाण्यावर बोली लावतील, तुम्ही हे विशिष्ट नाणे अधिक पैसे देऊ करणाऱ्या व्यक्तीच्या हातात विकू शकता.
याशिवाय तुमच्याकडे 5 पैसे आणि 10 पैशांची नाणी असली तरीही तुम्ही त्यांची विक्री करून पैसे कमवू शकता. परंतु, या नाण्यांसाठी एक अट आहे की, तुमच्याकडे ही नाणी असावीत, ज्यावर माँ वैष्णो देवीचं चित्र छापलेले असेल आणि ती 2002 मध्ये जारी करण्यात आली होती. अशी नाणी विकून तुम्ही पैसे कमवू शकता.
डिस्क्लेमरः ही बातमी वेगवेगळ्या स्त्रोतांकडून गोळा केलेल्या माहितीवर आधारित आहे. एबीपी माझा अशा कोणत्याही बातमीला दुजोरा देत नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- LPG Cylinder : चांगली बातमी! 'या' महिन्यात गॅस सिलिंडर बुक करा, पुढील महिन्यात पैसे द्या
- PSU Privatization : येत्या आर्थिक वर्षात तीन सरकारी कंपन्यांचे खासगीकरण; तीन आयपीओही येणार
- Flight Ticket Offer: लसीकरण झालेल्यांसाठी विमान कंपन्यांची खास ऑफर, कमी किंमतीत विमान प्रवास!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha