पैसे घेऊन तयार राहा, आता आला 'हा' नवा आयपीओ, देणार तगडे रिटर्न्स!
औफिस स्पेस सोल्यूशन्स लिमिटेड या कंपनीचा आयपीओ येणार आहे. या आयपीओकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण ग्रे मार्केटमध्ये हा आयपीओ ट्रेंड करतोय.
Awfis Space Solutions Limited IPO: आयपीओत गुंतवणूक करून चांगले रिटर्न्स मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. औफिस स्पेस सोल्यूशन्स लिमिटेड ही कोवर्किंग स्पेस कंपनी येत्या 22 मे रोजी आपला आयपीओ आणणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी एकूण 598.93 कोटी रुपये उभे करण्याचा प्रयत्न करणार आहे. अँकर गुंतवणुकदारांसाठी हा आयपीओ 21 मे रोजी खुला होणार आहे.
प्रत्येक शेअरची किंमत काय?
मिळालेल्या माहितीनुसार ऑफिस स्पेस सोल्यूशन्स लिमिटेड या कंपनीच्या आयपीएचो किंमत पट्टा 364 ते 383 रुपये प्रति शेअर असणार आहे. या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर एका वेळी 39 शेअर्सचा लॉट तुम्हाला खरेदी करावा लागेल. तसेच या आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी 128 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स जारी करणार आहे. 470.93 कोटी रुपयांचे शेअर्स हे ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकले जाणार आहेत.
30 मे रोजी आयपीओ शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार
22 ते 27 मे या कालावधीत या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. अयशस्वी गुंतवणूकदारांना 29 मे रोजी त्यांनी भरलेली रक्कम परत दिली जाईल. यशस्वी गुंतवणूकदारांच्या खात्यात 29 मे रोजी शेअर्स पाठवले जातील. या आयपीओची शेअर बाजारावर 30 मे रोजी लिस्टिंग होणार आहे. बीएसई, एनएसईवर हा आयपीओ लिस्ट होणार आहे.
आयपीओ देणार तगडे रिटर्न्स
या कंपनीचा आयपीओ खुलण्यासाठी अजून वेळ आहे. मात्र ग्रे मार्केटमध्ये हा आयपीओ ट्रेंड करतोय. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचा शेअर सध्या 80 रुपयांवर आहे. आगामी काही दिवस असीच स्थिती राहिल्यास हा शेअर 20.89 टक्क्यांच्या प्रिमियमवर 383 रुपये प्रति शेअरवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयपीओतून उभे केलेले पैसे ही कंपनी आपल्या विस्तारासाठी वापरणार आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
शेअर मार्केटमध्ये आला नवा स्कॅम, 'पिग बुचरिंगचे' शिकार झाल्यास होणार बँक खाते रिकामे!
मोदींनी 9 लाख गुंतवले, आता मिळणार 13 लाख रुपये, पोस्टाची 'ती' योजना आहे तरी काय?
पगार 10 लाख रुपये असला तरी शून्य कर, कसं शक्य आहे? जाणून घ्या नेमका फंडा काय?